हिमाचल प्रदेशातील शिमला येथे एका हॉटेलमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात एकाचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हा स्फोट कॉम्प्रेसर किंवा सिलेंडरच्या स्फोटामुळे घडल्याचं समजत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी सायंकाळी शिमल्यातील ‘हिमाचली-रसोई’ नावाच्या हॉटेलमध्ये हा स्फोट झाला. हॉटेलच्या स्वयंपाक घरात सिलेंडरचा स्फोट होऊन ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून किमान पाच जण जखमी झाले आहेत.
प्रथमदर्शनी ही घटना कॉम्प्रेसर किंवा सिलेंडरच्या स्फोटामुळे घडल्याचं दिसत आहे. पण याप्रकरणी अधिकची चौकशी आणि तपास अद्याप सुरू आहे. सर्व जखमींना इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती शिमलाचे पोलीस अधीक्षक संजीव कुमार गांधी यांनी दिली.