लग्नामध्ये नवऱयाच्या मित्राने सांगितलेल्या गाण्यावर नाचण्यास नकार दिल्यामुळे उत्तर प्रदेशात बलिया जिल्ह्यात एका महिला डान्सरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलीसांनी याप्रकरणी बिहारमध्ये इस्टेट एजंट म्हणून काम करणाऱया बबलू कुमार याला अटक केली. ही घटना गुरुवारी बलिया जिल्ह्यातील बैरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पिहू (२३) असे मृत्युमुखी पडलेल्या महिला डान्सरचे नाव आहे.
दया छापरा गावामध्ये होत असलेल्या लग्न समारंभात पिहू डान्स करीत होती. बिहारमधून आलेल्या व-हाडींमधून नवऱयाच्या मित्राने तिला एका भोजपुरी गाण्यावर नाचण्यास सांगितले. पिहूने दोनदा त्या गाण्यावर नाच केला. मात्र, बबलूकुमार याने तिसऱयांदा तिला त्याच गाण्यावर नाचण्यास सांगितल्यावर तिने त्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या बबलूने स्वतःजवळी गावठी कट्ट्यातून तिच्या छातीवर गोळ्या झाडल्या आणि त्यातच तिचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलीस अधिकारी सुरेशचंद्र रावत यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Apr 2015 रोजी प्रकाशित
भोजपुरी गाण्यावर नाचण्यास नकार दिल्याने महिला डान्सरची हत्या
लग्नामध्ये नवऱयाच्या मित्राने सांगितलेल्या गाण्यावर नाचण्यास नकार दिल्यामुळे उत्तर प्रदेशात बलिया जिल्ह्यात एका महिला डान्सरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

First published on: 24-04-2015 at 11:49 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dancer shot dead after she refuses to perform