scorecardresearch

कराची विमानतळावर दाऊदचा बोलबाला; ‘डी कंपनी’च्या संबंधितांना चौकशीशिवाय मिळतो प्रवेश

कोणाला शंका येऊ नये म्हणून दुबईमार्गे…

कराची विमानतळावर दाऊदचा बोलबाला; ‘डी कंपनी’च्या संबंधितांना चौकशीशिवाय मिळतो प्रवेश
दाऊद इब्राहिम ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम संबंधित धक्कादायक खुलासे होत आहेत. दाऊद इब्राहिमने एका पाकिस्तानातील पठाणी महिलेबरोबर दुसरं लग्न केलं आहे. तसेच, कराची विमानतळ ‘डी कंपनी’च्या ताब्यात आहे. दाऊद, छोटा शकील यांच्या जवळील व्यक्ती किंवा नातेवाईकांना विमानतळावरील इमिग्रेशन काउंटरवर सुद्धा जाण्याची गरज पडत नाही, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला ( एनआयए ) मिळाली आहे.

छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रूट, त्याची पत्नी आणि मुंबईतील एका ट्रॅव्हल कंपनीची एनआयएकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीवेळी ही माहिती समोर आली आहे. दाऊदच्या नातेवाईकांना कराची विमानतळावर कोणत्याही चौकशीशिवाय सोडण्यात येते. तसेच, चौकशीशिवाय माघारी पाठवलंही जातं. एकप्रकारे कराची विमानतळावर पाकिस्तान सरकार नाहीतर दाऊद इब्राहिमच्या ‘डी कंपनी’चा कब्जा आहे. तिथे फक्त ‘डी कंपनी’चा आदेश चालतो.

हेही वाचा : भाजपा खासदाराच्या मुलाचा मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल; थेट मुख्यमंत्र्यांवर केला हल्लाबोल!

कराची विमानतळावर दाऊद आणि छोटा शकील यांना भेटण्यास आलेल्या व्यक्तींना व्हीआयपी लाउंजमधून बाहेर काढलं जातं. त्यानंतर, थेट दाऊद इब्राहिम किंवा छोटा शकीलच्या घरी नेण्यातं येत. तसेच, पाकिस्तानात प्रवास केल्याचं दिसू नये, यासाठी दुबई अथवा अन्य देशाचं तिकीट काढून पाठवलं जातं.

हेही वाचा : “चित्रपटांवर अनावश्यक प्रतिक्रिया देणं टाळा”; पंतप्रधान मोदींचा भाजपा नेत्यांना सल्ला; म्हणाले, “आम्ही दिवसभर…”

सलीम फ्रूट आणि त्याची पत्नी ३ वेळा कराचीला जाऊन आले आहेत. सलीम फ्रूटने २ वेळा छोटा शकील याची भेटही घेतली आहे. २०१३ साली सलीम फ्रूट छोटा शकीलच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी आपल्या पत्नीसह कराचीला गेला होता. दुबईतून सलीम फ्रुट हा कराची विमानतळावर उतरला. तेव्हा त्यांच्या पासपोर्टवर कोणताही शिक्का न मारता प्रवेश देण्यात आला होता.

त्यानंतर एका माणसाने त्यांना छोटा शकीलच्या घरी पोहचवलं होतं. छोटा शकील आपल्या मुलीच्या साखपुड्यात उपस्थित होता. मात्र, लग्नात सलीम फ्रूटची उपस्थिती नव्हती. तसेच, २०१४ सालीही छोटा शकीलच्या दुसऱ्या मुलीच्या साखपुड्याासठी सलीम फ्रूट आपल्या पत्नीसह कराचीला गेला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 12:31 IST

संबंधित बातम्या