scorecardresearch

“त्यांना कळलं तर तो माणूस…”; उत्तर प्रदेशातील मंत्र्याच्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ

मी अशा व्यक्तीशी लग्न केले आहे, ज्याची भरपाई करू शकत नाही, असे मंत्र्यांनी म्हटले आहे

Dayashankar Singh beats me yogi government minister swati singh audio viral
(फोटो सौजन्य- PTI)

उत्तर प्रदेश सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्री स्वाती सिंह कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी पडत आहेत का तसेच त्यांचे पती दयाशंकर सिंह त्यांना मारहाण करतात का असे प्रश्न एक कथित ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर उपस्थित केले जात आहेत. व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये स्वाती सिंह एका व्यक्तीशी बोलत आहे जो त्यांचा पती दयाशंकर सिंह यांच्याबद्दल तक्रार करत आहे. यादरम्यान त्यांच्यातील संभाषण होत आहे हे दयाशंकर सिंह यांना कळायला नये, नाहीतर मला बेदम मारहाण केली जाईल, असे स्वाती सिंह यांनी म्हणत आहेत.

न्यूज १८च्या वृत्तानुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका ऑडिओ रेकॉर्डिंगमुळे योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्री स्वाती सिंह या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. “माझी परिस्थिती थोडी वेगळी आहे. त्यांना कळलं तर तो माणूस मलाही खूप मारहाण करेल. पण एखाद्या निष्पाप व्यक्तीसोबत असे घडावे असे मला कधीच वाटत नाही. आम्हा दोघां नवरा-बायकोचं नातं कसं आहोत, हे सगळ्या जगाला माहित आहे. मी स्वत: या गोष्टींचा (मारहाणीचा) विरोध करते. दयाशंकर सिंह आणि त्यांच्या भावाने मारहाणीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत,” असे स्वाती सिंह यांनी म्हटले.

“तुम्ही मला ते सर्व पेपर द्या. तुम्ही माझ्याशी बोललात हे दयाशंकर यांना कळायला नको. कारण हे दयाशंकर जी धर्मेंद्र सगळ्यांना… मी काय बोलू? मी देवाला सांगतो की माझ्यासोबत खूप चूकीचे झाले आहे. मी अशा व्यक्तीशी लग्न केले आहे, ज्याची मी भरपाई करू शकत नाही. दयाशंकर सिंह आणि त्यांच्या भावाला हे कळू नये, असेही स्वाती सिंह पुढे म्हणाल्या.

लखनऊमधील सरोजिनी नगर विधानसभा जागेसाठी स्वाती सिंह आणि त्यांचे पती दयाशंकर सिंह यांच्यात लढत आहे. योगी सरकारच्या मंत्री स्वाती सिंह या येथून तिकीटाच्या दावेदार आहेत, तर त्यांचे पती आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी देखील इथे आपला दावा सांगितला आहे. सध्या पत्नी स्वाती सिंह या मतदारसंघातून आमदार आहेत आणि योगी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत.

लव्ह मॅरेज करणाऱ्या दयाशंकर आणि स्वाती यांच्यातील संबंध बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. २००८ मध्ये स्वाती सिंह यांनी पती दयाशंकर विरुद्ध मारहाणीचा गुन्हाही दाखल केला होता. मात्र, दोघांनीही हे भांडण सार्वजनिकरित्या कधीच समोर येऊ दिले नाही. याआधी स्वाती सिंहवर वहिणीवर हल्ला करणे, घटस्फोट न घेता भावाचे पुन्हा लग्न करून देणे आणि वहिणीला घराबाहेर हाकलून दिल्याचे आरोप आहेत. स्वाती यांच्याविरुद्धचा खटला त्यांच्याच भावाची पत्नी आशा सिंह यांनी दाखल केला होता. हे प्रकरण सुमारे ११ वर्षे जुने आहे.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दयाशंकर सिंह यांनी बसपाच्या मायावती यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, त्यानंतर नसीमुद्दीन सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली बसपा कार्यकर्त्यांनी लखनऊमध्ये मोठे आंदोलन केले होते. या निदर्शनादरम्यान बसप कार्यकर्त्यांनी दयाशंकर सिंह यांच्या पत्नी स्वाती सिंह आणि मुलीबद्दल आक्षेपार्ह घोषणाबाजी केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून स्वाती मैदानात आल्या आणि महिला सन्मानाच्या नावाखाली मायावतींसह बसपच्या चार बड्या नेत्यांवर हजरतगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. स्वाती ज्या प्रकारे मायावतींच्या विरोधात आवाज उठवल्या त्यामुळे भाजपाला बळ मिळाल्याचे दिसत होते. याचा परिणाम असा झाला की ज्या जागेवर बसपचा विजय निश्चित मानला जात होता, त्या जागेवर स्वाती यांनी विजय मिळवला. यानंतर भाजपाने स्वाती यांना मंत्रीपदाची भेट दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dayashankar singh beats me yogi government minister swati singh audio viral abn

ताज्या बातम्या