भारतात दरवर्षी वीज पडून मृत्यू होणाऱ्या नागरिकांची संख्या २ हजार ५०० इतकी आहे. देशात १९६७ पासून २०१९ या काळात १ लाखापेक्षा अधिक लोकांचा वीज पडून मृत्यू झालाय. सरकारी आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. याच काळात नैसर्गिक आपत्तींमध्ये जेवढ्या लोकांना आपला प्राण गमावावा लागल्या त्याच्या एक तृतियांश लोकांचा वीज पडून मृत्यू झाला. याशिवाय वीज पडल्यानंतरही वाचलेल्या नागरिकांना अशक्तपणा, स्मृतीभ्रंष आणि अनेक व्याधी ग्रासतात.

आकाशातून पडणाऱ्या या वीजा ३०० मिलियन वॉल्ट आणि ३०,००० अॅम्पियर क्षमतेच्या आहेत. त्यामुळे यात माणसाचा मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. वीज पडल्यानंतर विजेच्या अवतीभवतीची हवा प्रचंड प्रमाणात तापते. हे तापमान सूर्याच्या पृष्ठभागावर असलेल्या तापमानाच्या ५ पट असतं. बीबीसीने याबाबत वृत्त दिलं आहे. दिल्लीतील गुरगावमध्ये नुकतीच ४ जणांवर वीज पडली. यात एकाचा मृत्यू झाला, तर अन्य लोक भाजले गेले. यातून वाचलेल्यांना नेमकं काय झालं हेही समजलं नाही. एका सेकंदात होत्याचं नव्हतं झाल्याची प्रतिक्रिया जखमींनी दिली.

mutual fund, market, investment, Assets, small cap
स्मॉल कॅप फंडांमधील मालमत्ता २.४३ लाख कोटींवर
solapur, 1139 crores turnover, onion business in Solapur, during adverse times, onion profit solapur, solapur Agricultural Produce Market Committee, onion in solapur, farmer, marathi news,
प्रतिकूल काळातही सोलापुरात वर्षात कांदा व्यवहारातून ११३९ कोटींची उलाढाल
Increase in average life expectancy of Indians
भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात वाढ
Mukesh Ambani
जागतिक महाश्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी नवव्या स्थानी; देशातील धनाढ्याच्या संपत्तीत वर्षभरात ४१ टक्क्यांची वाढ

७० टक्के मृत्यू ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये

एकूण मृत्यूंपैकी जवळपास ७० टक्के मृत्यू ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगाल या ३ राज्यांमध्ये झालेत. शेतात काम करणारे नागरिक वीजेचे बळी ठरत आहेत. ३ वर्षांपासून भारतातील मेटेरोलॉजिकल कार्यालयाने वीजेबाबत सतर्कतेचा इशारा देण्याची यंत्रणा सुरू केली आहे. मोबाईल अॅपच्या मदतीने वीजांचा मागोवा घेता येत आहे. यानंतर नागरिकांना रेडिओ, टीव्ही, मेगाफोनद्वारे इशारे दिले जातात. याशिवाय गावांमध्ये वीजेबाबत प्रबोधन, जनजागृती करून यातील मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

गावांमध्ये घरगुती वापराचे वीजेचे वाहक (कंडक्टर) निर्मिती

दुसरीकडे काही गावांमध्ये घरगुती वापराचे वीजेचे वाहक (कंडक्टर) देखील बनवण्यात आले आहेत. सायकलच्या रिंगला लाकडी बांबूला बांधून आणि त्याला तारां जोडून हे वीजेचे वाहक तयार केलं जातं. याचा उपयोग करून आकाशातून पडणाऱ्या वीजांना जमिनीत पाठवलं जातं.

हेही वाचा : मिरा भाईंदरमध्ये वादळाचं थैमान, उत्तन येथे नांगर मोडून बांधलेल्या बोटी समुद्रात बुडाल्या

वाढतं प्रदुषण, पर्यावरण बदल आणि जमिनीवरील वाढतं तापमान यामुळे वीजा पडण्याला पोषक वातावरण निर्माण होत आहे. जसजसं पृथ्वीवरील तापमान वाढत जाईल, तसतसे वीजेच्या कडकडाटासह येणाऱ्या वादळांची संख्या वाढेल, असं जाणकार सांगत आहेत.