नवी दिल्ली : यंदाच्या प्रजासत्ताकदिन सोहळ्याच्या दिल्लीतील संचलनात केरळ, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांच चित्ररथ समाविष्ट न करण्याच्या निर्णयाचा फेरविचार केला जाणार नाही, असे संरक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी स्पष्ट केले. संचलनासाठी यंदा १२ राज्यांच्या चित्ररथांची निवड करण्यात आली आहे. चित्ररथ वगळण्यात आल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांनी याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली होती. हा संबंधित राज्यांचा अवमान असल्याची टीका बिगरभाजप नेत्यांनी केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jan 2022 रोजी प्रकाशित
तीन राज्यांचे चित्ररथ वगळण्याच्या निर्णयाचा फेरविचार नाही
संबंधित राज्यांचा अवमान असल्याची टीका बिगरभाजप नेत्यांनी केली होती.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 19-01-2022 at 00:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decision to drop the three state chariot has not been reconsidered akp