एकीकडे पूर्व लडाख सीमेवर चीनशी तणातणी सुरू असतानाच भारताने आता रशियाकडून लढाऊ विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ३३ लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी (१२ सुखोई-३०एमकेआयएस आणि २१ मिग-२९) संरक्षण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. याशिवाय सध्या भारताकडे असलेले ५९ मिग-२९ लढाऊ विमानांचे अपग्रेडेशनही करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना २०३६ पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी कायम राहण्यासाठी संविधानात केलेल्या बदलांना रशियातील मतदारांनी मान्यता दिली. त्यामुळे पुतीन यांना आता २०३६ पर्यंत रशियाचे नेतृत्व करता येणार आहे. याबाबत गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना फोनवर शुभेच्छा दिल्या. त्यानंतर काही तासांमध्ये या संरक्षण कराराला संरक्षण खात्यानं मंजुरी दिली आहे. १८ हजार १४८ कोटी रुपयांच्या या खरेदीला मंजुरी मिळाल्याचे संरक्षण मंत्रालयानं जाहीर केलं आहे.

बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानच्या फायटर विमानांबरोबर झालेल्या हवाई संघर्षाच्यावेळी हवाई वर्चस्व किती महत्वाचे आहे ते आपल्या लक्षात आले आहे. भविष्यात पाकिस्ताबरोबर असे संघर्ष पुन्हा होऊ शकतात त्यावेळी आपल्याकडे एफ-१६ पेक्षा सरस विमाने असणे आवश्यक आहे. शिवाय चीनशी सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे येणाऱ्या काळात आपल्याकडे आणखी संरक्षण बळ लागणार आहे. त्या दृष्टीने रशियाशी होणारा हा व्यवहार महत्त्वाचा ठरणार आहे.

यावर्षी सप्टेंबर २०१९ मध्ये आपल्या ताफ्यात पहिले फ्रेंच बनावटीचे राफेल फायटर विमान दाखल होईल. भारताकडे मिग-२९ फायटर विमानांच्या तीन स्क्वाड्रन आहेत. या स्क्वाड्रन पश्चिम सीमेवर तैनात आहेत. नौदलाकडेही मिग-२९ विमाने आहेत. विमानवाहू युद्धजहाज आयएनएस विक्रमादित्यवर ही विमाने तैनात आहेत.

फेब्रुवारी २०१९ मध्ये एअर फोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक मिग-२९ च्या ताफ्याची पाहणी करण्यासाठी रशियाला गेले होते. रशियाने दीड वर्षाच्या आत २१ मिग-२९ विमाने देण्याचे आश्वासन दिले आहे असे एअर फोर्सच्या एका अधिकाऱ्याने तेव्हा सांगितले होते. अत्याधुनिक तंत्रज्ञान, रडारने ही विमाने सुसज्ज असून हवेतच इंधन भरण्याच्या क्षमतेमुळे ही विमाने चौथ्या पिढीमध्ये मोडतात. २८५ ते ३०० कोटी रुपये एका विमानाची किंमत असल्याचे बोलले जाते. अतिरिक्त इंधन टाकीने या विमानाची पाच तास उड्डाण करण्याची क्षमता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Defence ministry approves proposal to acquire 33 new fighter aircraft from russia pkd
First published on: 02-07-2020 at 17:16 IST