पीटीआय, नवी दिल्ली

कारगिल विजय दिनानिमित्त बुधवारी देशवासीयांनी सशस्त्र दलांच्या शौर्याला अभिवादन केले. या युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. १९९९ च्या कारगिल युद्धात पाकिस्तानवर भारताने विजय मिळविला होता. यानिमित्त बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देश आपला सन्मान आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी प्रसंगी ताबारेषा (एलओसी) ओलांडण्यास तयार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
Rajnath singh
“मासे खा, डुक्कर, हत्ती खा नाहीतर घोडा खा, पण…?” तेजस्वी यादवांच्या व्हीडिओवर राजनाथ सिंहांचा टोला
Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”
maval lok sabha marathi news, shrirang barne marathi news
मित्र पक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्यावर श्रीरंग बारणे यांचा भर, गाठीभेटी सुरू

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि सर्वपक्षीय नेत्यांनी कारगिल युद्धातील शहीद सैनिकांना आदरांजली वाहिली. २४ व्या कारगिल विजय दिनानिमित्त विविध राज्यांत आणि लडाखमधील द्रास येथील कारगिल युद्ध स्मारक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. संसदेत सदस्यांनीही शहीद जवानांना आदरांजली वाहिली.

द्रास येथील कारगिल युद्ध स्मारक येथे झालेल्या मेळाव्याला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, की, भारत आपला सन्मान आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी प्रसंगी ताबारेषा (एलओसी) ओलांडण्यास तयार आहे. अशा परिस्थितीत सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी तयार राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. रशिया-युक्रेन युद्धाचे उदाहरण देताना राजनाथ यांनी सांगितले, की हे युद्ध एका वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. कारण युक्रेनचे नागरिक युद्धात भाग घेत आहेत. देशाचा सन्मान आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. जर त्यात ताबारेषा ओलांडण्याचा समावेश असेल तर आम्ही ते करण्यास तयार आहोत. आम्हाला भडकवल्यास आम्ही ताबारेषाही ओलांडू.

जेव्हाही युद्धाची स्थिती आली, तेव्हा भारतीय जनतेने नेहमीच सैन्याला पाठिंबा दिला आहे, परंतु तो पाठिंबा अप्रत्यक्ष आहे. मी जनतेला आवाहन करतो की गरज पडल्यास थेट रणांगणावर सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी सज्ज आणि मानसिकदृष्टय़ा तयार राहावे. कारगिल युद्ध भारतावर लादण्यात आले होते, त्यावेळी पाकिस्तानने पाठीत वार केले होते. मात्र ‘ऑपरेशन विजय’दरम्यान आपल्या लष्कराने केवळ पाकिस्तानच नव्हे तर अवघ्या जगाला हे दाखवून दिले, की राष्ट्रहितासाठी कुठल्याही स्थितीत आम्ही मागे हटणार नाही. राष्ट्रहितासाठी आज आणि भविष्यातही आम्ही कायम बांधील राहू, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.