Delhi Woman Car Scooty Accident : दिल्लीतील सुलतानपुरी परिसरात कारने धडक देत फरफटत नेल्याने २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे ४ वाजता रस्त्यावर नग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळला. तरुणीच्या आईने अद्यापही आपल्या मुलीचा मृतदेह पाहिलेला नाही. मुलीच्या मृत्यूनंतर त्यांना मानसिक धक्का बसला आहे. “माझ्यासाठी माझी मुलगीच सर्व काही होती. काल ती कामावर गेली होती. संध्याकाळी ५.३० वाजता तिने घर सोडलं होतं. रात्री १० पर्यंत घरी येईन असं सांगून ती गेली होती,” हे सांगताना त्यांना अश्रू अनावर होत होते.

“मला तिच्या अपघाताची माहिती देण्यात आली आहे. पण मी अद्याप तिचा मृतदेह पाहिलेला नाही,” असं त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे. भावंडांमध्ये सर्वात मोठी असणाऱ्या तरुणीवर कुटुंबाची जबाबदारी होती. तिच्या मागे आई, चार बहिणी आणि दोन भाऊ असं कुटुंब आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचं निधन झालं होतं.

दिल्लीत स्कुटर चालवणाऱ्या २३ वर्षीय मुलीचा भीषण अपघातात मृत्यू, धडक देणाऱ्या कारने चार किलोमीटर फरफटवलं

दिल्ली पोलिसांनी कारमधील पाचजणांना अटक केली आहे. तरुणीच्या स्कुटीला धडक दिल्यानंतर तब्बल १२ किमीपर्यंत त्यांनी तिला फरफटत नेलं. यादरम्यान तिच्या शरिरावरील कपडेही फाटले. कारमधील सर्वजण मद्यधुंद अवस्थेत होते अशी माहिती आहे.

Delhi Accident CCTV: स्कुटीला धडक दिल्यानंतर १२ किमीपर्यंत फरफटत नेलं, मृतदेह गाडीखाली असतानाही थांबले नाहीत, पाहा व्हिडीओ

स्थानिकांनी कार तरुणीला फरफटत नेत असल्याचं पाहिल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर काही वेळातच रस्त्याच्या मधोमध नग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळल्याचा फोन पोलिसांना आला होता. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात पाठवला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौकशीदरम्यान आरोपींनी आपल्याला अपघाताची कल्पना आहे, मात्र गाडीखाली तरुणी असल्याची कल्पना नव्हती असा दावा केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.