महिलेला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी मंगळवारी अटक झाल्यानंतर तथाकथित भाजपा कार्यकर्ता श्रीकांत त्यागीचे सूर आता बदलले आहेत. ज्या महिलेशी त्यागीने गैरवर्तन केले होते ती महिला आपल्याला बहिणीसारखी असल्याचे त्याने माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. न्यायालयाने त्यागीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही संपूर्ण घटना राजकीय असून कोणीतरी आपली राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यागीने माध्यमांशी बोलताना केला. या घटनेविषयी त्याने यावेळी माफी देखील मागितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी महिलेला शिवीगाळ आणि धक्काबुक्की करतानाचा त्यागीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर बराच व्हायरल झाला होता. याप्रकरणी नोएडा पोलिसांनी त्याच्याविरोधात कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केल्यानंतर तो फरार होता. अखेर नोएडा पोलिसांनी त्याला मंगळवारी उत्तर प्रदेशातील मेरठमधून अटक केली. त्यागीच्या तीन साथीदारांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. समाजमाध्यमांवर स्वत:ला भाजपा किसान मोर्च्याचा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणवणारा त्यागी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi bjp worker shrikant tyagi who abused women said she is like a sister rvs
First published on: 10-08-2022 at 10:39 IST