पंजाबमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील लोकांमध्ये असलेले गाण्याप्रतीचे प्रेम लक्षात घेऊन आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या आवाजातले एक गाणे सादर केले आहे. अरविंद केजरीवाल यांनी गायलेल्या या गाण्याचा व्हिडिओ आपतर्फे समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये केजरीवाल ‘दूर गगन की छांव में’ चित्रपटातील गाणे गाताना दिसतात. मूळ किशोर कुमार यांच्या आवाजातील या गाण्याचे बोल बदलण्यात आले आहेत. नवीन बोल काहीसे असे आहेत – ‘एक ऐसे गगन के तले, जहां चोर भी ना हों, जहां भ्रष्ट भी ना हों, बस आप का राज चले’
.@ArvindKejriwal Sings For Punjabis
…एक ऐसे गगन के तले, जहाँ चोर न हो, जहाँ भ्रष्ट भी न हो, बस आप का राज चले! 🙂 pic.twitter.com/vqdpoGtoYK
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Aam Aadmi Party- AAP (@AamAadmiParty) May 15, 2016
या आधी कुमार विश्वास यांनीदेखील ‘एक नशा’ हे गाणे गायले होते.