दिल्लीला चार वर्षांत जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे. नोकऱ्यांना धक्का न लावता नवे तंत्रज्ञान आणण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी मध्य दिल्लीत यंत्राद्वारे सफाईच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी स्पष्ट केले.
सध्या प्रायोगिक तत्त्वावर या सफाई यंत्रांचा वापर केला जाणार आहे. तो जर यशस्वी झाला तर दिल्लीभर तो अमलात आणला जाईल, असे केजरीवाल यांनी सांगितले. मात्र अशा स्थितीत कुठल्याही सफाई कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढले जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. सफाई कामासाठी आठ यंत्रे आणण्यात आली आहेत. प्रचारात आम्ही दिल्लीला सर्वोत्तम शहर बनवण्याचे आश्वासन दिले होते. लोकांचा पाठिंबा असाच कायम राहिला तर पाच नव्हे, तर चार वर्षांतच संकल्प पूर्ण करू, असा निर्धार केजरीवाल यांनी व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jun 2015 रोजी प्रकाशित
‘चार वर्षांत दिल्लीचा चेहरामोहरा बदलणार’
दिल्लीला चार वर्षांत जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे.

First published on: 05-06-2015 at 06:56 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi government arvind kejriwal