दिल्ली उच्च न्यायालयाने यंदा १ ते ३० जून या कालावधीतील उन्हाळ्याची सुटी स्थगित करण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. करोनाच्या फैलावामुळे देशात संचारबंदी जारी करण्यात आल्याने प्रलंबित कामकाजाची भरपाई करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याचप्रमाणे दिल्ली उच्च न्यायालयाने अन्य संबंधित न्यायालयांच्या उन्हाळ्याच्या सुटीलाही स्थगिती दिली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि अन्य न्यायाधीशांनी हा निर्णय घेतला आहे.

देशात संचारबंदी जारी करण्यात आल्याने याचिकाकर्त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च न्यायालयात १६ मार्चपासून केवळ तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी घेतली जात आहे.

कोलकात्यातील कामकाज ३० एप्रिलपर्यंत स्थगित

कोलकाता : कोलकाता उच्च न्यायालय आणि अन्य संबंधित न्यायालयांमधील कामकाज ३० एप्रिलपर्यंत स्थगित ठेवण्यात येणार आहे, असे गुरुवारी येथे अधिकाऱ्यांनी सांगितले. देशातील विद्यमान स्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्य न्यायाधीश टीबीएन राधाकृष्णन यांनी वरील निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi high court decides to postpone summer vacations this year abn
First published on: 10-04-2020 at 00:21 IST