देशभरासह दिल्लीत कडाक्याची थंडी पडली आहे. गारठ्यापासून वाचण्यासाठी लोक खबरदारी घेत आहेत. लोकरीचे आणि थंडीपासून सुरक्षा प्रदान करणारे कपडे वापरण्यावर भर देण्यात येत असतो. मात्र दिल्लीत एका युवकाने गारठ्यापासून वाचण्यासाठी अजब शक्कल लढवली. ज्यामुळे आता त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. दिल्लीच्या प्रल्हादपूर परिसरात हा अजब प्रकार घडला आहे. त्यानंतर सदर युवकाला पोलिसांनी अटक केले.

या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दिल्लीतील प्रल्हादपूर परिसरातील जीसी ब्लॉक येथे किशन कुमार नामक आरोपीने रात्रीच्या थंडीपासून वाचण्यासाठी एका मोटारसायकलला आग लावून त्याची शेकोटी केली. आग लावल्यानंतर काही काळ आरोपीने आगीजवळ उभा राहून शेकोटीची उब घेतली, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Ten pigs are dying every day and citizens are suffering but there is no solution from the administration
अरेरे! हे काय, डुकरं पटापट मरताहेत आणि प्रशासन मात्र ढिम्म…
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री तीन वाजता आरोपी किशन कुमारने हिरो स्प्लेन्डर मोटारसायकलला आग लावली. मोटारसायकलला आग लागलेली पाहून मालकाने पोलिसात तक्रार दाखल केली. पहाटे साडे चार वाजता पोलिस घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण आणले गेले. मात्र तोपर्यंत मोटारसायकल पूर्णपणे जळून खाक झाली होती.

सीसीटीव्ही चित्रणाचा आधार घेऊन पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. किशन कुमारने पोलिसांना सांगितले की, त्याला थंडी वाजत होती. त्यामुळे त्याने मोटारसायकलला आगल लावली. पोलिसांनी त्याच्यावर भारतीय दंड संहिता कायद्या अंतर्गत कलम ४३५ अनुसार खटला दाखल केला.

या घटनेनंतर स्थानिकांनी सांगितले की, आगीची घटना घडण्याआधी किशन कुमारला तिथेच एका रिक्षात बसलेले पाहिले गेले होते. किशन कुमार गवंडी काम करतो. जीसी ब्लॉक येथे तो आपल्या कुटुंबासह राहतो. पोलिसांनी आरोपीची आरोग्य चाचणी घेतली असता तो गुन्हा घडला तेव्हा नशेत असल्याचे समजले.