scorecardresearch

दिल्ली: महापौर निवडीवरून आप-भाजपाच्या सदस्यांमध्ये पुन्हा राडा

दिल्लीत महापौर निवडीवरून पुन्हा एकदा आम आदमी पार्टी आणि भाजपामध्ये राडा झाला आहे.

दिल्ली: महापौर निवडीवरून आप-भाजपाच्या सदस्यांमध्ये पुन्हा राडा
फोटो- एएनआय

दिल्लीत महापौर निवडीवरून पुन्हा एकदा आम आदमी पार्टी आणि भाजपामध्ये राडा झाला आहे. दोन पक्षातील वादामुळे पुन्हा एकदा महापौर, उपमहापौराची निवड होऊ शकली नाही. यापूर्वी दिल्ली महानगरपालिकेत अशाच प्रकारचा गोंधळ उडाला होता. ‘आप’ आणि भाजपाच्या सदस्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली होती.

यानंतर आज (मंगळवारी) पुन्हा एकदा महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी सभागृह भरवण्यात आलं. यावेळी निवडून आलेल्या आणि स्वीकृत नगरसेवकांचा शपथविधी सुरळीत पार पडला. त्यानंतर सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. याच वेळेत भाजपा सदस्यांनी सभागृहात घोषणाबाजी सुरू केली. त्यांनी ‘आप’च्या सदस्यांच्या दिशेनं घोषणाबाजी करत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

या प्रकारामुळे दोन्ही पक्षांच्या सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. दोन्ही गटात बाचाबाची झाल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी दिवसभरासाठी सभागृह तहकूब केलं. यामुळे सभागृहात तणाव निर्माण झाला. याच्या निषेधार्त ‘आप’च्या आमदार-खासदार आणि सदस्यांनी आंदोलन सुरू केलं. त्यांनी सभा पुन्हा सुरू करून महापौर पदाची निवडणूक घ्यावी अशी मागणी केली. या सर्व प्रकारामुळे पुन्हा एकदा दिल्ली महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडली आहे. विशेष म्हणजे गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा महापौर निवडीवरून सावळागोंधळ पाहायला मिळाला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-01-2023 at 23:59 IST

संबंधित बातम्या