Delhi MCD Polls Counting Result 2022 : दिल्ली महानगरपालिकेच्या २५० वॉर्डांसाठी झालेल्या निवडणुकीचा आज निकाल असून, सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी ४ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. एक्झिट पोलच्या निकालात आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. मागील १५ वर्षांपासून दिल्ली महापालिकेवर भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे आप भाजपाची ही सत्ता खालसा करणार का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असताना, आम आदमी पार्टीने बहुमताचा आकडा ओलांडल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते विजयोत्सव साजरा करत आहेत. यावर आपच्या या यशावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

“अरविंद केजरीवालांनी दिल्लीतील १५ वर्षांपासूनची काँग्रेसची सत्ता उखडून फेकली आणि आता १५ वर्षांपासूनची दिल्ली महापालिकेतील भाजपाची सत्ताही उखाडली आहे. याचाच अर्थ असा आहे की, दिल्लीच्या लोकांना द्वेषाचे राजकारण आवडत नाही. जनता शाळा, रुग्णालये, वीज, स्वच्छता, पायाभूत सुविधांना मत देते.” असं भगवंत मान यांनी म्हटलं आहे.

narendra modi
पंतप्रधानांकडून प्रचारात जुनेच मुद्दे; विरोधकांची टीका, मित्रपक्षांचीही भिस्त मोदींवरच
election 2024 fight, bhandara gondia lok sabha constituency, congress, BJP
मतदारसंघ : भंडारा – गोंदिया; भाजप आणि काँग्रेसमधील लढतीत कोण बाजी मारणार ?
Hemant Godse still hopeful for Nashik seat It is claimed that Chief Minister is also insistent
नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे अजूनही आशावादी, मुख्यमंत्रीही आग्रही असल्याचा दावा
Sangli Friendly fight will be decided by congress in Delhi tomorrow
सांगलीतील मैत्रीपूर्ण लढतीचा उद्या दिल्लीत निर्णय

रविवारी ४ डिसेंबर रोजी दिल्ली महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीत ५०.४७ टक्के मतदान झाले. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत २५० प्रभागांमध्ये एकूण १३४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सध्या मतमोजणी सुरुवात असून लवकरच अधिकृत निकाल जाहीर होणार आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार आम आदमी पार्टील १११ जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपाने ९१ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला केवळ सहा जागा जिंकता आल्या आहेत आणि एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. याशिवाय आम आदमी पार्टी २१ जागांवर, भाजपा -१४ जागांवर आणि काँग्रेस २ जागांवर आघाडीवर आहे. याचबरोबर तीन अपक्ष आणि एक जागेवर एमआयएमचा उमेदवार आघाडीवर आहे.