चित्रपट अथवा एखाद्या मालिकांमध्ये थंड डोक्याने खून केल्याचं आपण पाहिलं आहे. तसाच खळबळजनक प्रकार दिल्लीत समोर आला आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीचा खून केला आहे. खून केल्यानंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. त्यानंतर हे तुकड्यांची दिल्लीतील १८ ठिकाणी विल्हेवाट लावली आहे. शरीराचे तुकडे फेकण्यासाठी तरुण रात्री २ वाजता बाहेर पडायचा.

आफताब अमीन पूनावाला, असे आरोपी तरुणाचे तर, श्रद्धा असे खून करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे. याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी आफताब पूनावालाला अटक केली आहे.

हेही वाचा : “गटार दर्जाचं राजकारण”, जितेंद्र आव्हाडांवरील आरोपानंतर अंजली दमानिया संतप्त; म्हणाल्या, “विनयभंगासारखी कृती…”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा आणि आफताब मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होते. तिथे दोघांची मैत्री झाली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झाले. पण, दोघांच्या प्रेमप्रकरणाला श्रद्धाच्या कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे दोघे दिल्लीला पळून जात मेहरौलीतील एका परिसरात राहत होते.

त्यानंतर तरुणीच्या वडिलांना श्रद्धाला अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तो होऊ न शकल्याने वडिलांना संशय आला आणि त्यांनी दिल्ली गाठली. जेव्हा वडिल मुलगी राहत असलेल्या फ्लॅटमध्ये पोहचले, तेव्हा तिथे कुलूप लावल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर त्यांनी मेहरौली पोलीस ठाण्यात तरुणीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली.

हेही वाचा : “माझी हत्या करण्याचा निर्णय…”, गुणरत्न सदावर्तेंना नक्षलवाद्यांचं धमकीचं पत्र; मराठा आरक्षण, महाविकास आघाडीचाही उल्लेख!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आफताब पूनावालाला शनिवारी अटक केली. तेव्हा पोलीस चौकशीत आफताबने धक्कादायक खुलासे केले आहेत. श्रद्धाला त्याच्याशी लग्न करायचे असल्याने दोघांत भांडणे होत होती. त्यामुळे आफताबने १८ मे २०२२ ला श्रध्दाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आफताबने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. ते तुकडे ठेवण्यासाठी त्याने फ्रीज विकत घेतला होता. १८ दिवस रात्री २ वाजता बाहेर पडून तुकड्यांची विल्हेवाट लावल्याचं, आफताबने पोलीस तपासात सांगितलं.