आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी आर्थिक रसद पुरवणे आणि नवीन तरुणांची भरती केल्याप्रकरणी दिल्लीतील विशेष न्यायालयाने दोन जणांना सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अझहर अल इस्लाम आणि मोहम्मद फरहान शेख अशी या दोषी तरुणांची नावे असून यातील मोहम्मद फरहान शेख हा महाराष्ट्रातील रहिवासी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीतील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अमर नाथ यांनी जम्मू काश्मीरच्या अझहर अल इस्लाम (वय २४) आणि महाराष्ट्राच्या मोहम्मद फरहान शेख (वय २५) या दोघांना शुक्रवारी सात वर्षांची शिक्षा सुनावली. या दोघांनीही वकील एम एस खान यांच्यामार्फत न्यायालयासमोर अर्ज केला होता. ‘आम्हाला आमच्या कृत्यांचा पश्चाताप असून आमची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. आम्हाला पुन्हा मुख्य प्रवाहात यायचे असून आम्हाला समाजासाठी चांगले काम करायचे आहे’ असे या दोघांनी अर्जात म्हटले होते. पण न्यायालयाने शुक्रवारी या दोघांनाही सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या दोघांना न्यायालयाने गुन्हेगारी कट रचून आयसिसला आर्थिक रसद पुरवणे तसेच नवीन तरुणांची भरती करणे याप्रकरणात दोषी ठरवले होते. त्यांच्यासोबत अदनान हसन या तरुणाला न्यायालयाने दोषी ठरवले असून त्याची वेगळी सुनावणी सुरु आहे. गुन्हेगारी कट रचणे आणि बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत या सर्वांना दोषी ठरवण्यात आले होते.

[jwplayer 3kdii4aQ]

राष्ट्रीय तपास यंत्रणेने गेल्या वर्षी २८ जानेवारीरोजी अझहर अल इस्लाम, मोहम्मद फरहान शेख आणि अदनान हसन या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. अबू धाबीवरुन दिल्लीत परतल्यावर त्यांना अटक करण्यात आली होती. हसन आणि शेख हे दोघेही २००८ ते २०१२ या कालावधीत दुबईला जात होते. तर इस्लाम हा २०१५ मध्ये यूएईत गेला होता. हसन यापूर्वी इंडियन मुजाहिदीनसाठी काम करायचा. त्यानंतर तो आयसिससाठी काम करु लागला असा आरोप एनआयएने केला होता.

[jwplayer v75Ufcz1]

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi special court sentences 7 years jail term for two men isis maharashtra jammju and kashmir
First published on: 21-04-2017 at 15:21 IST