मागील काही दिवसांपासून चीनमध्ये करोनाने पुन्हा हाहाकार माजवला आहे. रविवारी ४० हजार नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे सरकारकडून शून्य करोना रुग्ण धोरण राबवण्यात येत आहे. त्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, या निर्बंधाविरोधात चीनचे नागरिक रस्त्यावर उतरले असून, राष्ट्रपती शी जिनपींग यांना हटवण्याची मागणी करत आहेत.

शांघाई शहरात रविवारी लोक रस्त्यावर उतरून सरकारविरोधात निरर्शन करत आहेत. ‘शी जिंनपिग यांना हटवा,’ ‘कम्युनिस्ट पक्षाला हटवा’, ‘आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे’, अशा घोषणा नागरिक देत आहेत. या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा : “एवढं वाटतं तर केंद्राकडे फाईल पाठवूच नका, तुमचं तुम्हीच…”, न्यायाधीश नियुक्तीवरून केंद्रीय मंत्री आक्रमक; ‘कॉलेजियम’वर टीकास्र!

झालं काय?

शिंजियांगची राजधानी असलेल्यी उरुमकीमध्ये गुरुवारी एका इमारतीला आग लागली होती. त्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला होता. करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या कठोर निर्बंधामुळे ही इमारत बंद होती. त्यामुळे लोकांना वाचवण्यात अपयश आलं. यानंतर चीनमधील नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांनी रस्त्यावर उतरून निर्बंध हटवण्याबाबत सरकारविरोधात आंदोलन सुरु केलं आहे.

हेही वाचा : रामदेव बाबांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन महुआ मोईत्रांची खोचक टीका; म्हणाल्या, “आता मला कळलं तुम्ही त्यावेळी महिलेच्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रविवारी चीनमध्ये ४० हजार नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. उरुमकीमधील ४० लाख लोकांना १०० दिवस घरातून बाहेर पडण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याविरोधात शनिवारी नागरिक आपल्या घराजवळील मोकळ्या जागेत येऊन ‘लॉकडाऊन हटवा’चे नारे देत होते.