डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे हल्ले करणाऱ्याची ओळख डॅनिश प्रसारमाध्यमांनी पटवली असून नंतर संशयित व्यक्तीसह दोनजण गोळीबारात ठार झाले आहेत. ओमर अल हुसेन असे त्या हल्लेखोराचे नाव असून स्ट्रा-ब्लादेट या डॅनिश टॅब्लॉइड वर्तमानपत्राने असे म्हटले आहे की, ओमर अल हुसेन हा बावीस वर्षांचा युवक दोन आठवडय़ांपूर्वीच्या हल्लाप्रकरणी तुरुंगात होता, पण तेथून सुटल्यानंतर त्याने हे कृत्य केले. पोलिसांनी त्याच्या नावाला पुष्टी दिलेली नाही तरी पहाटेच्या वेळी चकमकीत तो मारला गेल्याचे सांगण्यात येते.
पोलिसांनी सांगितले की, आठवडय़ाच्या अखेरीस झालेल्या हल्ल्यात त्याचा हात होता व त्याचे गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध होते. कोपनहेगन ही जगातील सर्वात सुरक्षित राजधानी समजली जाते पण तेथे एका अभिव्यक्तिस्वातंत्र्य बैठकीत व दुसरीकडे सभास्थानी अशा दोन हल्ल्यात दोनजण ठार झाले होते. अल हुसेन याने नोव्हेंबर २०१३ मध्ये रेल्वेतील सहप्रवाशाला भोसकले होते. त्याला डॅनिश पोलिसांनी २०१३ च्या घटनेचे जे वर्णन केले आहे त्यातून दुजोरा मिळाला आहे. त्याने चाकूने प्रवाशाला भोसकले होते. पोलिसांनी सांगितले की, तो सीरिया किंवा इराकमध्ये गेला होता की नाही हे समजू शकले नाही व त्याला काही बाहेरून मदत होती किंवा कसे हे समजू शकले नाही.
दरम्यान डॅनिश पोलिसांनी कोपनहेगन येथे छापे टाकले असून संशयित हल्लेखोराला ठार केले असले तरी युरोपीय समुदायाची भीतीची भावना कायम आहे. पंतप्रधान हेली थॉर्निग-श्मिडट यांनी हे दहशतवादाचे कृत्य असल्याचे म्हटले आहे. डॅनिश प्रसारक टीव्ही २ या वाहिनीनेही २२ वर्षांचा युवक या हल्ल्यात सामील असल्याचे म्हटले होते,
हल्ल्याच्या घटनेत चित्रपटनिर्माते फिन नोरगार्ड यांचा मृत्यू झाला होता. यावेळी महंमद पैगंबराच्या २००७ मधील व्यंगचित्रांचे कर्ते लार्स व्हिल्कस हे उपस्थित होते. दुसऱ्या एका सभास्थानी झालेल्या हल्ल्यात डॅन उझान हे इमारतीचे रक्षक ठार झाले. या दोन हल्ल्यात पाच पोलीस अधिकारीही जखमी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Denmark attacker killed in firing
First published on: 17-02-2015 at 12:32 IST