तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करूणानिधी यांना चेन्नई येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ९२ वर्षीय करूणानिधी यांच्यावर सध्या त्यांच्या निवासस्थानी पाठीच्या दुखण्यावरील उपचार सुरू होते. शरीरातील पाण्याची कमतरता आणि अॅलर्जीमुळे त्यांची प्रकृती खालावली होती. दरम्यान, करूणानिधी यांना दाखल करण्यात येत असलेल्या कावेरी रूग्णालयाकडून त्यांच्या प्रकृतीबाबत निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये करूणानिधी यांच्या प्रकृतीवर डॉक्टर सातत्याने लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी त्यांना आणखी काही दिवस रूग्णालयात ठेवावे लागेल, अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे.