आज पंतप्रधान नरेंद मोदी हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. टीम मोदी कोण कोण असणार हे जवळपास निश्चित झालं आहे. शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर, भाजपा खासदार बाबूल सुप्रियो, भाजपा नेते धर्मेंद्र प्रधान, मुक्तार अब्बास, सदानंद गौडा, गिरीराज सिंग, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर हे चेहरे दिसणार आहेत. टीम मोदीमध्ये बऱ्यापैकी आधीच्याच मंत्र्यांना स्थान देण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाला लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवून दिलं. भाजपाला ३०३ जागा मिळाल्या. तर भाजपाप्रणित एनडीएला ३५० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे पुन्हा पंतप्रधानपदी मोदीच विराजमान होणार हे निकालाच्या दिवशीच निश्चित झालं होतं. आता टीम मोदीही ठरली असून आधीच्याच चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

आता आणखी कोणकोणती नावं समोर येतात आणि टीम मोदीमध्ये आणखी कोण कोण असणार याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधीही हजर रहाणार आहेत.

कसा असेल शपथविधीचा क्रम?

पंतप्रधान नरेंद्र मोदी
राजनाथ सिंग
अमित शाह<br />नितीन गडकरी
सदानंद गौडा
निर्मला सीतारमण
रामविलास पासवान
नरेंद्र सिंग तोमर
रविशंकर प्रसाद
हरसिमरत कौर बादल
थावरचंद गेहलोत
एस जयशंकर