Doctor slaps 77-year-old Video Goes Viral : मध्यप्रदेशातील छतरपूर येथील जिल्हा रुग्णालयात एका ७७ वर्षीय वृद्ध व्यक्तीस डॉक्टराने मारहाण केल्याचा प्रकार समोर आळा आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रविवारी हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता हा आरोप असलेल्या डॉक्टराच्या वर्तवणुकीची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना १७ एप्रिल रोजी घडली. वृद्ध व्यक्तीला मारहाण होत असताना उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ काढला आहे. या घटनेत उधवलाल जोशी नावाच्या एका व्यक्तीला रुग्णालयाच्या आवारात फरपटत नेण्यात आले तसेच नेले जात असल्याचे आणि रुग्णालयाच्या पोलिस चौकीत डांबून ठेवण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
जोशी हे त्यांच्या आजारी पत्नीला एका पोटाच्या आजारासंबंधी उपचारासाठी रुग्णालयात घेऊन आले होते. त्यांनी सांगितलं की ते इतरांप्रमाणे रांगेत वाट पाहात होते जेव्हा राजेश मिश्रा नावाच्या डॉक्टरबरोबर त्यांचा वाद झाला.
जोशी यांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी त्यांना रांगेत का उभे आहात असे विचारले आणि जेव्हा त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा डॉक्टरांनी त्यांना कानाखाली लगावली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयाच्या आवारातील पोलिस चौकीकडे ओढत नेले.
डॉक्टराने मला लाथा मारल्या आणि मला चौकीकडे फरपटत नेले. त्यांनी मला चापट मापली आणि माझा चश्मा तोडला. माझी स्लीप फाडून टाकत मला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. माझ्या पत्नीला देखील मारहाण झाली, असे जोशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
डॉक्टराचे म्हणणे काय?
डॉक्टरांनी असा दावा केला की तो व्यक्ती अयोग्य वर्तन करत होता. “मी रुग्णांची तपासत होतो आणि अचानक, या वृद्ध माणसाने रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्याने रुग्णालयातील कर्मचार्यांशीही गैरवर्तन केले. मी त्याला रांगेत उभे राहण्यास सांगितले तेव्हा त्याने माझा हात धरला आणि मला चापट मारली,” असे मिश्रा म्हणाले.
छत्तरपूर मेडिकल अथॉरिटीने या सुरूवातीला डॉक्टराची बाजू लावून धरली, मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच डॉक्टराला कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे.