डोनाल्ड ट्रम्प यांनी हे त्यांच्या सततच्या वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असतात. शिवाय त्यांनी भारतासह महत्त्वाच्या देशांवर टॅरिफ अर्थात आयातशुल्क लागू केलं. त्यामुळेही त्यांच्या निर्णायांचीही चर्चा झाली. गाझा येथील संघर्ष थांबवल्यानंतर मी संघर्ष थांबवण्यातला एक्स्पर्ट आहे असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांची या सगळ्यामागे भूमिका काय? हे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी दृष्टीकोन या लोकसत्ताच्या विशेष कार्यक्रमात सांगितलं आहे.
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी काय मत व्यक्त केलं?
उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यातल्या भेटी. तीन महिन्यांत ते सहावेळा कसे भेटले. जेवणावळीत काय पदार्थ होते? निवडणुका वगैरे. त्याचवेळी इस्रायलमध्ये गाझा पट्टीतल्या संघर्षातून हमासकडून ओलिसांची मुक्तता केली जाते आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आहे. हे विषय माहीत आहेत पण ज्यावर प्रकाश टाकला पाहिजे असा महत्त्वाचा विषय म्हणजे दोन दिवसांपूर्वी चीनवर १०० टक्के आयातशुक्ल वाढवू अशी डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा त्यानंतर घेतलेलं नमतं आणि दोन दिवसांत बाजारपेठेची झालेली घालमेल, हा विषय आपण समजून घेऊ.
ट्रम्प वरकरणी कितीही मतलबी, चक्रम किंवा बेभऱवशी वाटोत त्यांच्या कृतीमागे धागा आहे-गिरीश कुबेर
डोनाल्ड ट्रम्प यांना वाटलं म्हणून झालं असं नाही. ट्रम्प वरकरणी कितीही मतलबी, चक्रम किंवा बेभरवशाचे वाटोत ते जे काही करत आहेत त्यामागे काहीतरी एक निश्चित धागा दिसतो. वेडपटपणा मागे एक धागा दिसतो. तो त्यांच्या कूटचलनातल्या गुंतवणुकीचा आहे का? हा प्रश्न विचारात घेतला पाहिजे. डोनाल्ड ट्रम्प यांनी विधानं करणं, त्यानंतर बाजार कोसळणं, मग पुन्हा सावरणं या गोष्टी घडत आहेत. काही जणांच्या अंदाजानुसार १० बिलियन डॉलर्सचा फायदा ट्रम्प यांना झाला असावा असा अनेकांचा फायदा आहे. हे सरळ सरळ इनसायडर ट्रेडिंग आहे का? अशीही चर्चा आहे.
इथे पाहा पूर्ण व्हिडीओ
चीनने दुर्मिळ खनिजांच्या वापरांची अमेरिकेवर घातलेली बंदी आत्ताच का?
चीनने अमेरिकेवर दुर्मिळ खनिजांच्या वापरांची बंदी आणि मग ट्रम्प यांनी त्यांना दिलेलं उत्तर याचा संबंध लक्षात घेतला पाहिजे. ट्रम्प काही आत्ताच सत्तेत नाहीत. २०१६ मध्येही ते राष्ट्राध्यक्ष होते. त्यावेळी चीनबाबत त्यांचं मत तेच होतं जे आत्ता आहे. त्यावेळी त्यांनी चीनने इशारा का दिला नाही? बंदी का घातली नाही? दुर्मिळ खनिजं ही मायक्रो चीपसाठी लागतात. वीजेच्या वाहनांमध्ये लागतात. AI अर्थात कृत्रीम प्रज्ञांमध्ये यांचा उपयोग होतो. २०१६ किंवा २०२४ चा उत्तरार्ध या कालावधीत अशी बंदी घालावी असं चीनला का वाटलं नाही. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. असंही गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे.