Donald Trump भारत आणि पाकिस्तान यांच्या संघर्ष सुरु असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यस्थीने शस्त्रविराम झाला. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये शस्त्रविराम झाल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर भारतीय परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली होती. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातला काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
काय आहे डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्र विराम झाला आहे. दोन्ही देशांनी ही बाब समजून घेतली याचं मला समाधान आहे. आता काश्मीर प्रश्नावरही तोडगा काढू असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यशी माझी या विषयावर फारशी चर्चा झालेली नाही. मात्र दोन्ही देशांसह व्यापार विस्तार करण्याची अमेरिकेची भूमिका आहे. मी दोन्ही देशांशी चर्चा करुन आम्ही काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. देवाच्या प्रयत्नाने हा प्रश्न सुटेल असं वाटतं आहे असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
१० मे च्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट काय?
१० मे च्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट केली होती. त्यात भारत आणि पाकिस्तान यांच्याशी ९ मेच्या रात्री प्रदीर्घ चर्चा केली. ज्यानंतर दोन्ही देशांनी शस्त्रविराम देण्याचं ठरवलं आहे. अशी पोस्ट केली होती. ज्यानंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी माध्यमांना शस्त्रविराम झाल्याची माहिती दिली होती.
काश्मीर प्रश्नावर २०१९ मध्ये काय झालं होतं?
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान २०१९ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटले होते. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करु असं म्हटलं होतं. मात्र भारताने याबाबत नकार दिला होता. तसंच ट्रम्प यांचा प्रस्ताव स्वीकारला नव्हता. दरम्यान आता पुन्हा एकदा डोनाल्ड्र ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करु असं म्हटलं आहे.