सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी वरिष्ठ वकील विकास सिंह यांना झापलं आहे. विकास सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात खटला सूचिबद्ध करण्यावरून सरन्यायाधीशांकडे आग्रह केला. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विकास सिंह यांना सुनावलं. “मला कोर्टातील कामकाजाबाबत सांगू नका, माझ्या कोर्टात कामकाज कसं चालणार, हे मी ठरवेन” अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी आपला संताप व्यक्त केला.

वरिष्ठ वकील विकास सिंह यांनी वकिलांना चेंबर वाटपाच्या प्रकरणाचा उल्लेख करत, संबंधित खटला याच आठवड्यात सूचिबद्ध करण्यात यावा, अशी मागणी केली. तथापि, सरन्यायाधीशांनी त्यांना सांगितलं की, हे प्रकरण या आठवड्यात सूचीबद्ध करणं थोडं कठीण आहे. त्यामुळे याची सुनावणी ३ फेब्रुवारीला करता येईल.

हेही वाचा- “..तर घटनाबाह्य काम करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय नकळत परवानगी देतंय का?” तारीख पे तारीख वरुन ॲड. असीम सरोदे यांची खंत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण विकास सिंह यांनी हे प्रकरण लवकरात लवकर सुनावणीसाठी घेण्याचा आग्रह धरला. तसेच सूचीबद्ध प्रकरणांची सुनावणी करणे, हे न्यायालयाचं काम आहे, असा युक्तीवाद सिंह यांनी केला. यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, “मला कामकाज कसं करायचं हे सांगू नका, माझ्या कोर्टात कामकाज कसं चालणार, हे मी ठरवेन. काल माझ्याकडे वेळ नव्हता, त्यामुळे मी सुनावणी घेऊ शकलो नाही. संध्याकाळी ६ वाजता सुनावणी ठेवली तर याचा वकिलांना त्रास होईल. तसेच माझ्याकडेही इतर प्रशासकीय कामं आहेत,” अशा शब्दांच सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वरिष्ठ वकील विकास सिंह यांना झापलं.