धर्माच्या नावावर देशात विद्वेष, हिंसा पसरवली जात आहे, अशी टीका काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी मागील ऑक्टोबर महिन्यात कोल्हापुरात केली होती. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येण्या अगोदर त्यांनी हे विधान केलं होतं. यानंतर आता त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

दिग्विजय सिंह म्हणाले की, “काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेच्या परिणामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांना मदरसा आणि मशिदीत जावं लागलं आणि आता काही दिवसांतच पंतप्रधान नरेंद्र मोदीही टोपी घालायला सुरुवात करतील.”

नक्की पाहा – PHOTOS : शिंदे गटाला इशारा, २०२४ मध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ते वाढदिवशी देवाकडे केलेली प्रार्थना; जाणून घ्या संजय राऊत काय म्हणाले

दिग्विजय सिंह हे भारत जोडो यात्रेचे आयोजन समितीचे प्रमख आहेत. त्यांनी इंदुरमध्ये पदयात्रेच्या तयारीबाबत आढावा घेताना, प्रसारमाध्यमांबरोबर संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “भाजपा काही दिवसांपासून टीकेसाठी विशेषकरून राहुल गांधींना यासाठी निवडत आहे, कारण त्यांच्या भारत जोडो यात्रेच्या महिनाभराच्या आतच भागवत मदरसा आणि मशिदीत जाऊ लागले आहेत, थोड्याच दिवसांत मोदीही टोपी घालायला सुरुवात करतील.”

हेही वाचा – Gujarat Election: “ शासकीय कार्यालयांमधील मोदींचे फोटो काढा किंवा झाका”; ‘आप’ची निवडणूक आयोगाकडे मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय दिग्विजय सिंह यांनी हेही सांगितले की, “पंतप्रधान मोदी सौदी अरब आणि अन्य देशांमध्ये टोपी घालतात. परंतु ते भारतात परतल्यानंतर टोपी घालत नाहीत. याचसोबत त्यांनी दावा केली की, ७ डिसेंबरपासून कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेचा एवढ परिणाम दिसत आहे की, संघाच्या एका बड्या नेत्यास म्हणावे लागले की गरीब लोक आणखी गरीब तर श्रीमंत लोक आणखी श्रीमंत होत आहेत. त्यांनी हेही सांगितले की, जेव्हा ही यात्रा तिच्या शेवटच्या ठिकाणावर पोहचेल तेव्हा काय होतं ते तुम्ही पाहा.”