दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत शनिवारी भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभविप) सर्व जागा जिंकल्यामुळे ‘मोदी लाट’ कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. ‘अभाविप’च्या सदस्यांनी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सहसचिव या चारही जागांवर मोठ्या फरकाने विजय मिळविला आहे. ‘अभाविप’साठी हा मोठा विजय असल्याचे सांगण्यात येत आहे. या निवडणुकांसाठी विद्यापीठातील तब्बल एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मतदान केले होते. अध्यक्षपद आणि सहसचिवाच्या पदासाठी सात उमेदवारांमध्ये चुरस होती. तर उपाध्यक्ष पदासाठी सहा आणि सचिवपदासाठी आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. अध्यक्षपदाच्या शर्यतीत अभाविपच्या मोहित नागर याने २० हजार ७१८ मतांनी विजय मिळविला. तर, उपाध्यक्षपदाच्या लढतीत परवेश मलिक याने २१ हजार ९३५ मतांनी विजय मिळविला. सचिवपदी कानिका शेखावत हिने व सहसचिव पदावर आशुतोष माथुर यांनी विजय मिळविला. या चारही पदांवर काँग्रेसची अखिल भारतीय विद्यार्थी संघटना दुसऱ्या स्थानावर राहिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dusu polls witness modi wave bjp affiliated abvp wins all 4 seats
First published on: 13-09-2014 at 02:11 IST