म्यानमार-भारत सीमेजवळच्या भागाला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के बसले. यासंदर्भातील माहिती युरोपीय-भूमध्य भूकंप केंद्राने यासंदर्भातील माहिती दिलीय. समोर आलेल्या माहितीनुसार बांगलादेशच्या चटगावपासून १७५ किमी पूर्वेला ६.३ रिश्टर स्केलचा मोठा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचे झटके भारतामधील पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसामपर्यंत जाणवले. तसेच शुक्रवारी ईशान्येकडील राज्यांपैकी एक असणाऱ्या मिझोरममध्येही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एएनआय वृत्तसंस्थेने सीएमसीएच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. दुसरीकडे नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीने देलेल्या माहितीनुसार मिझोरमच्या थेनवॉलपासून ७३ किमी दूर दक्षिण-पूर्वमध्ये ६.१ तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आलाय.

आसाममधील सर्वात मोठं शहर असणाऱ्या गुवहाटीसहीत राज्यातील इतर काही भागांमध्ये शनिवारी दुपारी ४.१ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचे केंद्र कामरुप जिल्ह्यामध्ये जमीनीखाली १० किमीवर होते. रात्री १ वाजून १२ मिनिटांनी भूकंपाचे हे झटके जाणवले. गुवहाटी आणि आजूबाजूच्या परिसारामध्ये हा भूकंप प्राकर्षाने जाणवला.

या भूकंपामध्ये कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही. ईशान्य भारतामधील हा भाग भूकंपप्रवण क्षेत्रापैकी आहे. २८ एप्रिल रोजी राज्याला ६.४ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earthquake of magnitude 6 point 1 strikes myanmar india border region emsc scsg
First published on: 26-11-2021 at 09:59 IST