बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव हे लोकसभा प्रचारासाठी राज्यभर दौरे करत आहेत. दौऱ्यात फिरत असताना हेलिकॉप्टरमध्ये जेवण उरकावं लागतं, हे सांगण्यासाठी तेजस्वी यादव यांनी स्वतःचा एक व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. मात्र या व्हिडिओवरून आता त्यांना ट्रोल करण्यात आले. यावरून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी टीका केली आहे. “काही नेते मतदारांना संतुष्ट करण्यासाठी नवरात्रीच्या दरम्यान मांसाहारी पदार्थांचे व्हिज्युअल पोस्ट करत आहेत, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

“तुम्ही नवरात्रीच्या काळात मासे खात आहात. तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? मासे, डुक्कर, कबूतर, हत्ती किंवा घोडा तुम्ही जे काही खात आहात ते खा. दाखवायची काय गरज आहे? हे फक्त मतांसाठ तुष्टीकरणाचे राजकारण आहे. ते त्यामुळे एका विशिष्ट धर्माचे लोक त्यांना मतदान करतील, असे वाटते, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बिहारच्या जमुई येथे पक्षाच्या बैठकीत म्हणाले. अरुण भारती, एनडीएचे उमेदवार आणि एलजेपी (रामविलास) नेते चिराग पासवान यांचे मेहुणे यांना पाठिंबा देण्यासाठी ते तेथे आले होते.

तेजस्वी यादव यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. ज्यात ते हेलिकॉप्टरमध्ये बसून मासे खात होते. नवरात्री सुरू असताना हा व्हीडिओ समोर आल्याने त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. हा व्हिडीओ नवरात्रीच्या आधीचा असल्याचे निदर्शनास आणून तेजस्वी यादव म्हणाले,”भाजप आणि गोदी मीडिया फॉलोअर्सचा बुद्ध्यांक तपासण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ अपलोड केला होता. ट्विटमध्ये “दिनांक” म्हणजेच तारीख असे म्हटले आहे, परंतु गरीब अंध अनुयायांना काय माहित आहे?”, असंही ते म्हणाले. तेजस्वी यादव यांनी ९ एप्रिल रोजी हा व्हीडिओ पोस्ट केला होता, ज्यात त्यांनी ८ एप्रिलची तारीख नमूद केली होती.

हेही वाचा >> नवरात्रीच्या काळात मासे खाल्ल्यामुळे तेजस्वी यादव ट्रोल; भाजपा नेते म्हणतात, “हंगामी सनातनी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माशांनंतर संत्र्याचा व्हीडिओ

मासांहाराच्या व्हीडिओवरून ट्रोल झाल्यानंतर तेजस्वी यादव यांनी संत्री खातानाचा व्हिडीओ जारी करून या संत्र्याच्या रंगावरून तर मला ट्रोल करणार नाही ना, असा उपहासात्मक टोलाही त्यांनी लगावला.