बिहार विधानसभा निवडणुकांचा पहिला टप्पा जवळ येऊन ठेपला असताना, निवडणूक जाहीरनामा तयार करताना पाळावयाच्या मार्गदर्शक तत्त्वांची निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना आठवण करून दिली असून, जाहीरनामा प्रसिद्ध केल्याबरोबर त्याची एक प्रत आपल्याला द्यावी, असे सांगितले आहे.
निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केल्याच्या तारखेनंतर संबंधित राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांनी त्याची एक प्रत निवडणूक आयोग किंवा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला द्यावी, असे आयोगाने कळवले आहे.
बिहार निवडणुकांच्या तोंडावर निवडणूक आयोगाने शुक्रवारी जारी केलेले ‘पुरवणी प्रसिद्धीपत्रक’ हे त्याने एप्रिल महिन्यात सर्व मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षांसाठी जारी केलेल्या अशाच पत्राची आठवण देणारे आहे. या मुद्दय़ावर सर्वोच्च न्यायालयाने जुलै २०१३ मध्ये दिलेल्या आदेशानुसार आम्ही निवडणूक जाहीरनाम्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली होती, अशी आठवण या पत्रकातून राजकीय पक्षांना देण्यात आली आहे. कुठल्याही राजकीय पक्षाने निवडणूक जाहीरनाम्याच्या प्रतीसह तिची एक ‘सॉफ्ट कॉपी’ आयोगाच्या रेकॉर्डसाठी पाठवावी, असे सांगणाऱ्या आयोगाने ही प्रत आपल्याला कशासाठी हवी याचे कुठलेही कारण दिलेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ec wants a copy of election manifestos
First published on: 05-10-2015 at 01:31 IST