Economic Survey 2023 : येत्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ६ ते ६.८ टक्के वाढेल अशी अपेक्षा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वोक्षणात व्यक्त केली आहे. २०२२-२३ चा आर्थिक अहवाल संसदेच्या पटलावर ठेवला. आर्थिक सर्वेक्षणात २०२३-२४ चा GDP वाढीचा दर ६.५ टक्के असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील तीन वर्षांचा विचार केला तर ही वाढ सर्वात कमी असणार आहे. Nominal GDP ११ टक्के राहिल असंही म्हटलं गेलं आहे.

आर्थिक सर्वेक्षणातले प्रमुख मुद्दे काय आहेत?

२०२२-२३ या वर्षात सेवा क्षेत्राने ८.४ टक्के वाढ नोंदवली पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच २०२३-२४ मध्ये ९.१ टक्के वाढ अपेक्षित आहे.

nagpur, polling station,
मतदान केंद्रावरील कर्मचारीच म्हणतो, बोटाला शाई कशाला हवी?
importance of rest for airline pilots
विश्लेषण : वैमानिकांची विश्रांती का महत्त्वाची?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

करोनामुळे झालेल्या तोट्याची भरपाई पूर्ण झाली आहे. करोनाच्या काळात देशाची आर्थिक घडी विस्कटली होती मात्र यावर्षी ती भरून निघाला आहे असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

सेवा क्षेत्राला बँकांकडून होणाऱ्या वित्तपुरवठ्यातही सकारात्मक वाढ झाली आहे. ही वाढ २१ टक्क्यांची आहे.

वैद्यकीय उपचारांसाठी जगभरातून भारतातून येणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. चांगल्या जगातील ४६ देशांमध्ये भारताचा क्रमांक दहावा आहे अशी माहिती आर्थिक अहवालात नोंदवण्यात आली आहे.

भारतात वाढली थेट परकीय गुंतवणूक

भारतात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघही चांगला वाढला आहे. UNCTAD च्या २०२२ च्या जागतिक गुंतवणूक अहवालात जगभरातील सर्वाधिक विदेशी गुंतवणूक मिळवणाऱ्या २० देशांमध्ये भारताचं स्थान आठवं आहे. भारतात यावर्षी ८४ अब्ज अमेरिकी डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक झाली आहे. त्यातील एकट्या सेवाक्षेत्रात ७.१ अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे.

इकॉनॉमिक सर्व्हे म्हणजे काय?

भारत देशात मध्यमवर्गीय लोकांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे आपल्या घरांघरांमध्ये महिन्याचं बजेट कसं ठरवायचं किंवा जमा-खर्चाचा ताळमेळ कसा घालायचा यासाठी डायरी किंवा वही ठेवली जाते. वर्ष संपल्यानंतर आपण त्या डायरी किंवा वहीचा आढावा घेऊ शकतो. घरात कुठे किती पैसे खर्च झाले? कुठे जास्त पैसे खर्च झाले? कुठे पैसे वाचवता आले असते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळू शकतात. आर्थिक सर्वेक्षण हे आपल्या घरातल्या हिशोबाच्या वही किंवा डायरी प्रमाणेच असते. अर्थ संकल्पाच्या एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण सादर केलं जातं.