scorecardresearch

जौहर विद्यापीठ प्रकरण; समाजवादी पक्षाचे आमदार आझम खान यांच्या पत्नी आणि मुलाला ईडीचे समन्स

ईडीने जौहर विद्यापीठ प्रकरणात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत आझम खान यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

azam khan
आझम खान

समाजवादी पक्षाचे आमदार आझम खान यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. रामपूरमधील जौहर विद्यापीठ प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आझम खान यांची पत्नी तजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला आझम यांना समन्स बजावले आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल्ला आझम आणि तजीन फातिमा यांना ईडीच्या झोनल मुख्यालयात १५ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

हेही वाचा- “माझ्यासाठी कालीमाता मांसाहार, मद्याचा स्वीकार करणारी”, तृणमूल खासदार महुआ मोईत्रांचं विधान; ‘त्या’ पोस्टरवरून वाद!

कुटुंबातील अन्य सदस्यांनाही समन्स पाठवणार
ईडीने आझम खान यांचा मुलगा आमदार अब्दुल्ला आझम खान आणि पत्नी ताजीन फातिमा यांना समन्स बजावल्यानंतर अन्य नातेवाइकांनाही समन्स पाठवण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

हेही वाचा- दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाड; कराचीत इमर्जन्सी लँडिंग

काय आहे प्रकरण?

१ ऑगस्ट २०१९ रोजी, ईडीने जौहर विद्यापीठ प्रकरणात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत आझम खान यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी ईडीच्या २ सदस्यीय पथकाने सीतापूर तुरुंगात आझम खान यांचीही चौकशी केली होती. त्याचबरोबर विद्यापीठाच्या नावाने निधी उभारणे आणि पैसे हस्तांतरित केल्याप्रकरणी ईडी आता आझम खान यांच्या कुटुंबीयांची चौकशी करणार आहे. विशेष म्हणजे सीतापूर तुरुंगात सुमारे २७ महिने राहिल्यानंतर आझम खान २० मे २०२२ रोजी बाहेर आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ed has summons samajwadi party mla azam khan wife and son in johar university case dpj

ताज्या बातम्या