हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुकीचे बिगूल वाजले असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी तारीख जाहीर करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये १२ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून मतमोजणी ८ डिसेंबर रोजी पार पडेल, अशी माहिती अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.

हेही वाचा – Gyanvapi Case: हिंदू पक्षकारांना झटका, ‘शिवलिंगा’ची कार्बन डेटिंग टेस्ट करण्यास न्यायालयाचा नकार

दरम्यान, १७ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होईल. तर २५ ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल. या निवडणुकीसाठी एकूण ७८८१ मतदान केंद्र तयार करण्यात आले असून यापैकी १४२ केंद्र हे केवळ महिला आणि ३७ केंद्र दिव्यांगासाठी असणार आहे. तसेच ५५ लाख मतदारांपैकी १.८६ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – निवडणूक आयोगाने प्रथा-परंपरा मोडली ; एकाच वेळी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे टाळले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या एकूण ६८ जागा असून गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ४४ जागा जिंकत सरकार स्थापन केले होते. तर काँग्रेसने २१, सीपीआय १ आणि २ जागा अपक्षांनी जिंकल्या होत्या.