न्यूयॉर्क : विख्यात अब्जाधीश उद्योगपती व ‘ट्विटर’चे प्रमुख इलॉन मस्क यांच्या विमानाबद्दलची माहिती प्रसिद्ध केल्यानंतर त्यांनी अनेक पत्रकारांची ‘ट्विटर’खाती काही काळ बंद केली होती. मात्र, त्यावर जगभरातून जोरदार टीका झाल्यानंतर या पत्रकारांची ‘ट्विटर’ खाती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मस्क यांनी घेतला.

पत्रकारांची ‘ट्विटर’ खाती बंद करताच शुक्रवारी जगाच्या कानाकोपऱ्यांतून सरकारी अधिकाऱ्यांचे दबाव गट आणि पत्रकारांच्या संघटनांकडून टीकेची झोड उठल्यानंतर या खात्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. 

CRPF killed 1 terrorist in Pulwama
काश्मीरच्या पुलवामामध्ये मोठी चकमक, CRPF च्या जवानांकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका
NIA team attacked in Bengal
पश्चिम बंगालमधील ‘एनआयए’च्या पथकावरील हल्ला प्रकरणात ट्विस्ट; अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”

मस्क यांनी नंतर घेतलेल्या ‘ट्विटर’ सर्वेक्षणात बहुसंख्य जणांनी निलंबित केलेली ही ‘ट्विटर’खाती पुन्हा कार्यान्वित करावीत, असेच मत व्यक्त केले. हा कल पाहिल्यानंतर मस्क यांनी शनिवारी एका ‘ट्वीट’ संदेशात नमूद केले, की बहुसंख्य लोकांनी आपली मते व्यक्त केली आहेत. ज्या ‘ट्विटर’ खात्यांनी माझ्या ठावठिकाण्यासंदर्भात माहिती दिली, त्या खात्यांचे निलंबन आता मागे घेतले जाईल.

यावर प्रतिक्रियेसाठी रॉयटर्स’ वृत्तसंस्थेने ‘ट्विटर’शी संपर्क साधला मात्र, या विनंतीला ‘ट्विटर’’कडून त्वरित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर ‘रॉयटर्स’ने न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन आणि वॉशिंग्टन पोस्टच्या पत्रकारांची निलंबित खाती सुरू केली का हे तपासले. तेव्हा ही खाती कार्यान्वित झाल्याचे निदर्शनास आले.

काय आहे प्रकरण?

‘एलॉनजेट’ नावाच्या ‘ट्विटर’ खात्यावर सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीद्वारे मस्क यांच्या खासगी विमानाचा मागोवा घेतला गेला. त्यातून मतभेद निर्माण होऊन संबंधितांची खाती बंद करण्यास सुरुवात झाली. बुधवारी मस्क यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थक असल्याचे सांगून ‘एलॉनजेट’ खाते बंद केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, नंतर प्रत्यक्षात ‘ट्विटर’ने या खात्यासह मस्क यांच्या खासगी विमानांचा मागोवा घेणारी इतर खातीही निलंबित केली. त्यानंतर ‘ट्विटर’ने अल्पावधीत ठावठिकाण्याची अद्ययावत माहिती (लाइव्ह लोकेशन) सामायिक करण्यास मनाई करण्यासंबंधीचे आपले गोपनीयता धोरण बदलले. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन आणि वॉशिंग्टन पोस्टसह अनेक पत्रकारांची खाती कोणतीही सूचना न देता ‘ट्विटर’ने निलंबित केली होती.

टेस्लाच्या समभागांची घसरण

मस्क यांची इलेक्ट्रिक मोटार उत्पादन कंपनी ‘टेस्ला’चे समभाग शुक्रवारी ४.७ टक्क्यांनी घसरले. मार्च २०२० नंतरची त्यांची ही सर्वात वाईट साप्ताहिक घसरण आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीच्या पाश्र्वभूमीवर मस्क अशा मुद्दय़ांत गुंतून विचलित होत आहेत. यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ असल्याचे हे चिन्ह असल्याचे मानले जाते.

कारवाईचा जगभरातून निषेध

फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन आणि युरोपीय संघाच्या अधिकाऱ्यांनी या ‘ट्विटर’ खाती निलंबनाचा निषेध केला होता. या प्रकाराला एका सुप्रसिद्ध सुरक्षातज्ज्ञाने ‘गुरुवारी रात्रीची दुर्घटना’ असे म्हटले आहे. मस्क जरी स्वत:ला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते मानत असले तरी त्यांना व्यक्तिगतरित्या नापसंत असलेला मजकूर आणि संबंधित खातेधारकांना ते हटवतात, अशी टीका त्यांच्या विरोधकांनी केली आहे. ताजे प्रकरण त्याचा बोलका पुरावा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. फ्रान्सचे उद्योग मंत्री रोलँड लेस्क्युर यांनी शुक्रवारी ‘ट्वीट’द्वारे इशारा दिला, की मस्क यांनी पत्रकारांची ‘ट्विटर’ खाती निलंबित ठेवल्यास ते ‘ट्वीटर’चा वापर थांबवतील. त्यांची स्वत:ची क्रियाकलाप निलंबित करतील. संयुक्त राष्ट्रांच्या संपर्क प्रमुख मेलिसा फ्लेिमग यांनी ‘ट्वीट’ केले, की पत्रकारांच्या खात्यांच्या निलंबनामुळे आपण खूप व्यथित झालो आहोत. माध्यम स्वातंत्र्य हे खेळण्यासारखे नसते. जर्मनीच्या परराष्ट्र कार्यालयाने ‘ट्विटर’ला इशारा दिला, की प्रसारमाध्यम स्वातंत्र्य धोक्यात आणणाऱ्या त्यांच्या या कृतीवर त्यांच्या मंत्रालयाचा आक्षेप आहे.