संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० पर्यंत वाढविण्याचा विचार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे संचालक मंडळ करीत असून त्यादृष्टीने येत्या ५ फेब्रुवारी रोजी बैठक घेण्यात येणार आहे. २० वर्षांहून अधिक काळ निवृत्तीवेतन घेणाऱ्या खातेधारकांना देण्यात येणारी बोनस रक्कम रद्द करण्याचाही या बैठकीत विचार होणार आहे. सध्या या क्षेत्रातील कर्मचाऱ्याचे निवृत्तीवय ५८ असल्याने त्यानंतर त्यांना या योजनेअंतर्गत गुंतवणूक करता येत नाही, हे चित्र बदलण्यासाठी केंद्रीय कामगार मंत्री ऑस्कर फर्नाडिस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Feb 2014 रोजी प्रकाशित
संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवय ६०?
संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० पर्यंत वाढविण्याचा विचार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे संचालक मंडळ करीत असून त्यादृष्टीने येत्या ५ फेब्रुवारी रोजी बैठक घेण्यात येणार आहे.
First published on: 03-02-2014 at 01:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Epfo to consider raising retirement age to 60 yrs in feb 5 meet