Thailand Firing News : थायलंडमध्ये गुरुवारी (६ ऑक्टोबर) एका माथेफिरूने पाळणाघरात घुसून बेछुट गोळीबार केला. यात चिमुरड्यांसह एकूण ३१ जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे आरोपी माजी पोलीस होता. त्याने या गोळीबारानंतर स्वतःवरही गोळी झाडत आत्महत्या केली. राऊटर या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मृतांमध्ये २३ लहान मुलं, दोन शिक्षक आणि एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे.

थायलंडमध्ये बंदूक बाळगणाऱ्यांचं प्रमाण या भागातील इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे. विशेष म्हणजे सरकारच्या अधिकृत आकड्यांमध्ये मागील अनेक वर्षे सीमापार भागातून येणाऱ्या बेकायदेशीर हत्यारांचा समावेश नाही.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या माथेफिरू माजी पोलीस कर्मचाऱ्याने दुपारच्यावेळी पाळणाघरात बेछुट गोळीबार केला. इतकंच नाही, तर आपल्याजवळील चाकूनेही हल्ला केला. यात अनेक चिमुरड्या मुलांचा गोळी लागून किंवा चाकून भोसकल्याने मृत्यू झाला.

हेही वाचा : VIDEO: हात बांधलेले, तोंडावर पट्टी; अमेरिकेतील भारतीय वंशाच्या कुटुंबाचा अपहरणाचा व्हिडीओ आला समोर, पाहा नेमकं काय घडलं?

या घटनेनंतर थायलंडच्या पंतप्रधानांनी पोलिसांना तातडीने या गुन्ह्यातील दोषींना अटक करून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेचा तपास सुरू आहे, मात्र आरोपीने गोळीबार का केला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

२०२० मध्ये २९ जणांची हत्या

थायलंडमध्ये अशीच एक घटना २०२० मध्ये घडली होती. एका सैनिकाने संपत्तीच्या व्यवहारावरून २९ जणांची हत्या केली होती. या हल्ल्यात ५७ जण जखमी झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex cop fire in pre shool many children dead in thailand pbs
First published on: 06-10-2022 at 14:15 IST