पीटीआय, नवी दिल्ली

उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यात १५ दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी मजूरांद्वारे खोदकामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर बोगद्याच्या टेकडीला उभा छेद देऊन कामगारांपर्यंत पोहोचण्याचा नवा मार्ग तयार करण्याचे कामही सुरू करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) रविवारी दिली.दरम्यान, बचाव कार्यात मदतीसाठी लष्करात खंदक खोदण्याचा अनुभव असलेल्या अभियंत्यांची एक तुकडीही रविवारी सकाळी बोगद्याच्या ठिकाणी दाखल झाली आहे. 

hot temperature, reptiles, snakes affected, cold temperature, enters in citizen colony, marathi news, snake news, snake in uran, uran news, uran snake news,
उरण : उन्हाच्या तडाख्याचा सरपटणाऱ्या प्राण्यांना फटका, गारव्यासाठी नागरी वस्तीत शिरकाव
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
Drain cleaning mumbai
नालेसफाईला सुरुवात, आतापर्यंत १५ टक्के गाळ काढला

कामगारांना बाहेर काढण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याचे ‘एनडीएम’चे सदस्य लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी पत्रकारांना सांगितले. दुसरा सर्वोत्तम पर्याय उभे खोदकाम करणे हा असून रविवारी दुपारी त्यास सुरुवात करण्यात आली. सुमारे ८६ मीटपर्यंत उभे खोदकाम केल्यानंतर, अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बोगद्याचा वरचा थर तोडावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.  मजुरांच्या सुटकेसाठी सहा योजना अमलात आणण्यात येत आहेत, मात्र जमिनीला समांतर खोदकाम हा आतापर्यंतचा सर्वात चांगला पर्याय आहे. त्यानुसार ४७ मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे, असेही हसनैन यांनी सांगितले.दरम्यान, ऑगर यंत्राचे तुटलेले भाग ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी मॅग्ना आणि प्लाझ्मा कटरचा वापर करण्यात येत आहे.

हेही वाचा >>>“तुम्ही शिकलात ती शाळा…”, केसीआर यांच्या टीकेला राहुल गांधींचं प्रत्युत्तर

सहा योजना..

अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सहा योजना तयार करण्यात आल्या आहेत. त्यात जमिनीला समांतर खोदकाम हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे एकाचवेळी मजूरांद्वारे जमीन समांतर खोदकाम आणि टेकडीवरून उभे खोदकाम करण्यात येत असल्याचे ‘एनडीएमए’च्या वतीने सांगण्यात आले.