scorecardresearch

Premium

आता मोबाईलवरूनही करता येणार रेल्वे तिकिटांचे आरक्षण

एसएमएसवरून रेल्वेचे तिकीट आरक्षित करण्याची सुविधा पुढील महिन्यापासून प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आता मोबाईलवरूनही करता येणार रेल्वे तिकिटांचे आरक्षण

एसएमएसवरून रेल्वेचे तिकीट आरक्षित करण्याची सुविधा पुढील महिन्यापासून प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देशातील मोबाईल सेवा पुरविणाऱया सर्व कंपन्यांच्या मोबाईलवरून रेल्वे तिकीट आरक्षित करता येणार आहे. तिकीट आरक्षित करण्यासाठीचा मोबाईल क्रमांक रेल्वेतर्फे लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.
आयआरसीटीसीच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱया या सेवेमध्ये प्रवाशांना सुरुवातीला आयआरसीटीसी आणि बॅंकेकडे आपली नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर देशभरात कोठूनही ते रेल्वेचे तिकीट आरक्षित करू शकतील. पाच हजार रुपयांपर्यंत तिकीट आरक्षित केल्यास पाच रुपये आणि त्यापुढील रुपयांच्या आरक्षणासाठी दहा रुपये इतके शुल्क आकारण्यात येईल. एसएमएमच्या माध्यमातून आरक्षित केलेल्या तिकिटाची प्रिंटआऊट घेण्याची गरज नसल्याचेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.
या तिकिटासाठी वन टाईम पासवर्ड आणि मोबाईल मनी आयडेंटिफायरच्या माध्यमातून पैशांचा व्यवहार होईल, असे आयआरसीटीसीने म्हटले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Facility to book railway tickets from mobile sms

First published on: 12-06-2013 at 12:10 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×