S T O P P E D   I M M E D I A T E L Y…  S E R V I C E   N O   M O R E…
गेली १६३ वर्षे संदेशांची देवाणघेवाण करून अनेक कडू-गोड बातम्यांचा साक्षीदार ठरलेल्या तारसेवेने रविवारी भारतात अखेरचा श्वास घेतला.
भारत संचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर. के. उपाध्याय यांनी सांगितले, की तारसेवा रविवारी सकाळी ८ वाजता सुरू करण्यात आली व रात्री ९ वाजता बंद करण्यात आली. आता सोमवारपासून ही सेवा उपलब्ध होणार नाही.
देशात सध्या ७५ तार केंद्रे होती व एक हजार कर्मचारी तिथे काम करीत होते. बीएसएनएल या कर्मचाऱ्यांना लँडलाइन व ब्रॉडबँड सेवेत समाविष्ट करून घेणार आहे. साठ वर्षांनंतर मे २०११ मध्ये तारेचे दर वाढवण्यात आले होते. देशातील तारेसाठी ५० शब्दांना २७ रुपये पडत होते. रविवारी शेवटची तार पाठवली जाईल ती संग्रहालयात जपून ठेवली जाणार आहे. एसएमएस, इमेल, मोबाइल फोनच्या जगात तारसेवा निष्प्रभ ठरली आहे.
वकील तारेचा वापर भारतीय पुरावा कायद्याअंतर्गत साधन म्हणून करीत असत. बॉलिवूडच्या त्या काळातील चित्रपटात आपल्याला तारेचा उल्लेख असलेली दृश्ये दिसतात. आजही ग्रामीण भागात तारसेवा वापरली जात असे.