scorecardresearch

काश्मिरमध्ये जीपला बांधलेल्या फारूक दारला बिग बॉसमध्ये 50 लाखांची ऑफर

मागच्यावर्षी काश्मीरमध्ये जीपला बांधल्यामुळे चर्चेत आलेला काश्मिरी युवक फारुख अहमद दार याला रिअॅलिटी टीव्ही शो बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची ऑफर आली होती.

काश्मिरमध्ये जीपला बांधलेल्या फारूक दारला बिग बॉसमध्ये 50 लाखांची ऑफर

मागच्यावर्षी काश्मीरमध्ये जीपला बांधल्यामुळे चर्चेत आलेला काश्मिरी युवक फारुक अहमद दार याला रिअॅलिटी टीव्ही शो बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची ऑफर आली होती. त्यासाठी त्याला ५० लाख रुपयेही देऊ करण्यात आले होते. पण फारुक अहमद दारने ही ऑफर नाकारली.

मागच्यावर्षी काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या जमावाच्या तावडीतून जवानांची सहीसलामत सुटका करण्यासाठी मेजर नितीन गोगोई यांनी फारुक अहमद दार या काश्मिरी युवकाला जीपला बांधून त्याचा मानवी ढाल म्हणून वापर केला होता. गोगोई यांच्या या निर्णयावर परस्परविरोधी मते व्यक्त झाली होती. काहींनी गोगोईच्या निर्णयाचे समर्थन केले होते तर काहींनी टीका केली होती.

मागच्यावर्षी जुलै महिन्यात बिग बॉसच्या निर्मात्यांनी शो मध्ये सहभागी होण्यासाठी मला ५० लाख रुपये देऊ केले होते. माझे तिकिट तयार असल्याचे त्यांनी मला सांगितले होते असे दारने हिंदू वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले.

बिग बॉस हा शो कलर्स मनोरंजन वाहिनीवर लागतो. या वाहिनीने या वृत्ताला दुजोराही दिलेला नाही किंवा फेटाळलेलेही नाही. फारुक दारला जीपला बांधल्याचे फोटो समोर आल्यानंतर तीन महिन्यांनी आपल्याला ही ऑफर आल्याचे त्याने म्हटले आहे. जम्मू-काश्मीरच्या मानवी हक्क आयोगाने राज्य सरकारला फारुख दारला १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले होते. पण जम्मू-काश्मीर सरकारने मानवी हक्क आयोगाची ही शिफारस फेटाळून लावली होती.

जम्मू काश्मीरमधील श्रीनगर मतदारसंघात पोटनिवडणुकीदरम्यान सैन्याच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती. बडगाम जिल्ह्यात दगडफेकीपासून बचाव करण्यासाठी जवानांनी लष्करी जीपच्या पुढील भागावर फारुक अहमद दार युवकाला बांधून नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सैन्याच्या या कृतीबद्दल अनेक मतमतांतरे पाहायला मिळत होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2018 at 18:41 IST

संबंधित बातम्या