father cracked murder of his 14-year-old son through CCTV footage Crime news : बंगळुरू येथे फेब्रुवारी २०१५ साली एका ८वीत शिकणारा मुलगा बेपत्ता झाला. त्याच्या पालकांनी आणि पोलिसांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. अखेर ६ दिवसांनंतर त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. यानंतर आपल्या मुलाच्या मारेकऱ्याला शोधून काढण्यासाठी वडील चक्क डिटेक्टिव्ह बनल्याचे पाहायला मिळले. याहूनही अधिक धक्कादायक गोष्ट म्हणजे, तो मुलागा आपल्या मारेकऱ्याला प्रेमाने ‘अण्णा’ म्हणून हाक मारायचा.

बंगळूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये झालेल्या या १४ वर्षीय मुलाच्या हत्येमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. विद्यार्थ्याच्या आईने आरोपीला दिलेल्या एका सल्ल्यामुळे ही हत्या करण्यात आल्याचे नंतर उघड झाले. या प्रकरणात आरोपीला दोषी ठरवून शिक्षाही झाली. पुढे या मुलाचे कुटुंबीय बेंगळुरूमधून दुसरीकडे निघून गेले.

नेमकं काय झालं?

४ फेब्रुवारी २०१५ साली चंद्र लेयआउट येथील रहिवाली असलेल्या बीएम रवी कुमार आणि प्रमिला यांचा मुलगा किरण यादव हा त्याच्या मल्लातथाहल्ली येथील श्री चैतन्य टेक्नो स्कूलमधून घरी परतला नाही. तो सामान्यतः स्कूलबसने शाळेत जात असे आणि विश्व भारती शाळेजवळ उतरून चालत घरी येत असे.

रवी यांनी शाळेत संपर्क साधला असता, स्कूल बस चालकाने पुष्टी केली की किरण नेहमीच्या ठिकाणी उतरला होता. रवी यांनी चंद्र लेआउट पोलिसांशी संपर्क साधून तो बेपत्ता झाल्याची दाखल केली. १० फेब्रुवारी २०१५ रोजी, बंगळूर विद्यापीठाच्या जंगलाच्या भागात शालेय गणवेशात असलेल्या एका लहान विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी मुलाची ओळख पटवण्यासाठी रवी यांना बोलावून घेतले. पोहचल्यानंतर आपल्या मुलाचा गळा चिरलेला पाहून रवी यांना मोठा धक्का बसला. चंद्र लेआउट पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “संशय घ्यावा असे कोणी नव्हते, कारण रवी यांचे असे कोणाबरोबरही शत्रूत्व नव्हते जो त्यांच्या मुलाला इजा करेल. आम्ही रवी आणि त्यांच्या पत्नीच्या पार्श्वभूमीची तपासणी केली, परंतु काही महत्त्वाची माहिती मिळाली नाही.”

मुलाच्या वडिलांनीच तपास घेतला हाती

जेव्हा पोलीस आरोपीचा शोध घेत होते, तेव्हा त्यांना या प्रकरणाचे कोणतेही धागेदोरे सापडत नव्हते. “पोलिसांचा तपास हा तेवढा प्रभावी नव्हता . ते इतर अनेक प्रकरणांमध्ये व्यस्त होते. पण माझ्या मुलाची हत्या झाली होती आणि मला वाटले की उशीराचा परिणाम गुन्हेगाराला शोध घेण्यावर होईल,” असे रवी २०१७ मध्ये म्हणाले होते.

रवी यांनी विश्व भारती शाळेजवळील भागाला भेट दिली आणि तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले . त्यांनी प्रत्येक दुकान आणि घरातून मिळालेल्या फुटेजची बारकाईने तपासणी केली. “मला ५० ते ७५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील व्हिज्युअल्स तपासण्यासाठी सहा दिवस लागले,” असे रवी यांनी स्पष्ट केले.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये किरण परत आल्यानंतर एका दुचाकीवर जाताना दिसून आला. इतर कॅमेरा फुटेज पाहिल्यानंतर रवी यांना आढळून आले की किरण हा मंजुनाथच्या दुचाकीवर गेल्याचे समोर आले. मंजुनाथ हा तेव्हा २२ वर्षांचा होता आणि तो घरमालकाचा मुलगा असलेला मंजुनाथ हा रवी यांच्या कुटुंबाच्या घराजवळच राहायचा.

त्यांचा संशयाची पुष्टी करण्यासाठी रवी यांनी मंजुनाथ आणि किरण दुचाकीवरून गेले होते त्या भागातील व्हिडीओ रेकॉर्डिंग्ज गोळा केल्या. “मी त्यानंतर सर्व फुटेज पोलिसांना दिले आणि मंजुनाथ याच्या सहभागाबद्दल मला असलेल्या शंकांबद्दल त्यांना सांगितले,” असे रवी यांनी सांगितले.

मंजुनाथ संशयितांच्या यादीत नसण्याचे एक कारण म्हणजे, हत्येनंतरही तो त्याच परिसरात राहिली, किरणच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिला आणि जो मुलगा त्याला अनेकदा ‘अण्णा’ (मोठी भाऊ) म्हणून हाक मारायचा, त्याच्या निधनाबद्दल तीव्र दुःखही व्यक्त केले. ते दोघे एकत्र क्रिकेटही खेळायचे. शाळेत जायला उशीर झाल्यास तो मुलगा कधीकधी मंजुनाथच्या घरी जेवणही करायचा.

नेमकं कारण काय?

डिजीटल पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी मंजुनाथ याला ११ फेब्रुवारी २०१५ रोजी अटक केली. चौकशीदरम्यान समोर आले की किरण स्कूल व्हॅनमधून खाली उतरला, तेव्हा मंजुनाथ वाट पाहत होता. त्याने खोटं सांगितलं की, “तुझा भाऊ पडला आणि त्याला दुखापत झाली आहे. तुझ्या घरचे त्याला रुग्णालयात घेऊन गेले आहे. पटकन माझ्याबरोबर चल.”

मुलगा मंजुनाथच्या काळ्या दुचाकीवर बसला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संध्याकाळी ६.०७ वाजता ते जाताना दिसून आले. यावेळी किरणने शाळेचा गणवेश घातलेला असून त्याची शाळेची बॅग देखील दिसून येत आहे.

शवविच्छेदन अहवालात किरणचा गळा चिरल्याचे आढळून आले, पोलिसांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली, जिथे त्यांना समजले की मंजुनाथने एका दुकानातून पाच शेव्हिंग ब्लेड्स खरेदी केल्या होत्या. त्याने किरण यादवला मुख्य रस्त्यापासून २०० ते ३०० मीटर आत दाट झाडीत नेऊन त्याची हत्या केली होती.

हत्येच्या उद्देशाबद्दल बोलताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, डिसेंबर २०१४ मध्ये, किरणची आई प्रमिला यांनी मंजुनाथच्या आईकडे त्याच्या चारित्र्याबद्दल तक्रार केली होती, ही तक्रार विशेषत: एका अश्विनी नावाच्या व्यक्तीसंबंधी होती.

अश्विनी ही मंजुनाथच्या मालकीच्या एका घरा भाड्याने राहणाऱ्या एका कार चालकाची पत्नी होती. अश्विनी आणि मंजुनाथ यांचे अनैतिक संबंध होते, जे प्रमिला यांच्या लक्षात आले होते. त्यांनी मंजुनाथच्या आईला याबद्दल माहिती दिली आणि यामुळे मोठ्या अडचणीत सापडण्यापासून वाचवण्यासाठी यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. पोलिसांनी आरोपपत्रात याचा उल्लेख केला होता, जो न्यायालयाने स्वीकारला.