राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात भारतीय हवाई दलातील मिग-२१ लढाऊ विमानाचा शनिवारी अपघात झाला.  या दुर्घटनेतून वैमानिक सुखरुप बचावला आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच हवाई दलाचे अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून विमान नेमके कसे कोसळले, हे शोधण्यासाठी हवाई दलाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. लढाऊ विमान असणाऱ्या मिग-२१ चा राजस्थानमध्ये सरावादरम्यान कोसळले. मिग-२१ विमाने यापूर्वीही कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या ४० वर्षांपासून मिग विमाने भारतीय हवाई दलाच्या सेवेत असून येत्या २०१८ पर्यंत ही विमाने हवाई दलाच्या सेवेत राहणार आहेत.