बिहारमधील गोपाळगंजमध्ये एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आला आहे. याठीकाणी वऱ्हाडी एकमेकांशी भीडले. दरम्यान त्यांच्यात तुफान हाणामारी झाली. यामध्ये ११ लोकं गंभीर देखील झाले. जेवणात आवडता पिस माशाचे डोके न भेटल्याने ही हाणामारी झाली. ही घटना सिसई टोला भटवालिया गावची आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेवणात माशाचा ‘आवडता पिस’ न भेटल्याने वऱ्हाडी आणि घरातील लोकांमध्ये आधी शाब्दीक वाद झाले. त्यानंतर हा वाद एका माशाचा पिससाठी विकोपाला गेला. याठीकाणी थेट हाणामारी सुरु झाली.

हाणामारीत दोन्ही बाजूचे ११ लोक गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांना उपचारासाठी सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गावात राहणाऱ्या छठू गोंड नावाच्या व्यक्तीच्या मुलीचे लग्न होते. नरकटिया गावातून आलेल्या वऱ्हाड्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पण जशी जेवणाची वेळ आली तसा स्वागत समारंभाचा हाणामारीने निरोप समारंभ झाला.

जेवणात नव्हता आवडता पिस (फिश हेड)

वऱ्हाड्यांना जेवणात मासे आणि भात देण्यात आला होता. त्याचवेळी काही वऱ्हाडी ‘फिश हेड’ वाढण्याची मागणी करत होते. मात्र, ‘फिश हेड’ संपल्यामुळे त्यांना वाढता आले नाही. त्यामुळे वऱ्हाडी चांगलेच संतापले. सुरुवातीला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत वाद-विवाद झाले. त्यानंतर लवकरच हा वाद-विवाद हाणामारीत बदलला.

लग्नाच्या कार्यक्रमात खुर्च्या फेकल्या जाऊ लागल्या. या हिंसक हाणामारीत ११ लोक जखमी झाले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रत्येकाची वेगवेगळी विधाने नोंदविली. हथुआ उपविभागीय अधिकारी नरेश कुमार म्हणाले की, दोन्ही बाजूंकडून चौकशी केली जात आहे.

जेवणात चिकन न वाढल्यामुळे गोळीबार

यापुर्वी बिहारमध्ये अशा घटना घडल्या आहेत. लग्नसमारंभात खाण्यावरून वाद झाल्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वी जेवणात चिकन न वाढल्यामुळे गोळीबार झाला होता. आता फिश करी वरुन वाद झाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fighting in bihar for favorite piece of fish 11 people seriously injured srk
First published on: 12-06-2021 at 14:59 IST