Filmmaker missing after Ahmadabad Air India plane crash : अहमदाबाद येथे गेल्या गुरूवारी एअर इंडियाचे विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली, या घटनेने संपूर्ण देश हादरला असून सर्व स्तरातून याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. यादरम्यान यावेळी वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात असलेला एक चित्रपट निर्माता अचानक गूढपणे बेपत्ता झाला आहे. महेश कलावाडिया असे या व्यक्तीचे नाव असून ते नरोडा येथील रहिवासी आहेत. सध्या त्यांचा सर्वत्र शोध घेतला जात आहे. इतकेच नाही तर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या डिएनएचे नमूने देखील प्रशासनाकडे दिले आहेत.

वैद्याकिय महाविद्यालयाच्या हॉस्टेलवर गुरूवारी विमान कोसळल्यापासून कुटुंबियांचा त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. या विमान दुर्घटनेत विमानातील १४१ जणांचा तर बाहेरील किमान २९ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांचे मृतदेह ओळख पटवण्याच्या पलीकडे जळालले आहेत, ज्यामुळे प्रशासनाकडून डीएनए चाचणी करून त्यांची ओळख पटवली जात आहे.

महेश यांच्या पत्नीने सांगितले की, पोलिसांनी त्यांना माहिती दिली की त्यांचा फोन विमान दुर्घटना झाली त्याच्यापासून ७०० मिटर अंतरावर आढळला आणि विमानाने उड्डान करण्याच्या काही मिनिटांपूर्वी तो बंद झाला.

“माझ्या पतीने दुपारी १.१४ वाजता त्यांची बैठक संपली आहे आणि ते घराकडे येत आहेत हे सांगण्यासाठी फोन केला. मात्र जेव्हा ते परतले नाहीत तेव्हा मी त्यांच्या मोबाईल फोनवर कॉल केला तर तो बंद होता. पोलिसांकडे गेल्यानंतर त्यांच्या मोबाईल फोनचे शेवटचे लोकेशननुसार ते दुर्घटनेच्या ठिकाणापासून ७०० मीटर अंतरावर असल्याचे आढळून आले,” असे हेतल यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

“त्यांचा फोन दुपारी १.४० वाजता बंद झाला (अपघात झालेल्या विमानाने उड्डाण केल्यानंतर एका मिनिटानंतर). त्यांचे स्कूटर आणि मोबाईल फोन गायब आहे. हे विचित्र आहे कारण घरी येताना ते हा रस्ता कधीच वापरत नसत (शेवटच्या लोकेशननुसार). विमान अपघातामुळे जमिनीवर मृत्यू झालेल्यांमध्ये ते आहेत का हे तपासण्यासाठी आम्ही डीएनए नमून दिले आहेत,” असेही पुढे त्या म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आत्तापर्यंत फक्त ४७ मृतांची ओळख डीएनए चाचणीच्या माध्यमातून झाली आहे आणि प्रशासनाने २४ मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवले आहेत.