केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या वक्तव्यामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. निर्मला सीतारामन यांच्या ‘युपी टाइप’ वक्तव्यावरुन काँग्रेस हल्लाबोल करत असून निवडणुकीचा मुद्दा बनवला आहे. काँग्रेसने सोशल मीडियावरही केंद्रीय अर्थमंत्र्यांना याप्रकरणी घेरलं आहे.

अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत त्यांच्यावर निशाणा साधला. प्रियंका गांधी यांनी हा उत्तर प्रदेशच्या लोकांचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील लोकांना ‘युपी टाइप’ असल्याचा गर्व आहे. आम्हाला उत्तर प्रदेशची भाषा, संस्कृती आणि इतिहासाचा गर्व आहे. तुम्ही अर्थसंकल्पात उत्तर प्रदेशसाठी काही दिलं नाहीत, ठीक आहे…पण किमान अशाप्रकारे येथील लोकांचा अपमान करण्याची गरज नव्हती? असं प्रियंका गांधी म्हणाले आहेत.

not a single word about Sharad Pawar in pm narendra modis speech in wardha
मोदींच्या भाषणात शरद पवारांबाबत चकार शब्द नाही, काय असावे कारण…
What Jitendra Awhad Said About Ajit Pawar?
जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर जहरी टीका, “राष्ट्रवादीतून फुटून गेलेले पाकिटमार आणि दरोडेखोर, कारण..”
What Raj Thackeray Said About Sanjay Raut?
राज ठाकरेंचा संजय राऊतांना टोला, “कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं, आत्ताच तुरुंगातून..”
uddhav thackeray and kangana
“भाजपाई कंगनाने तिचे अगाध ज्ञान पाजळून इतिहासाची…”, ठाकरे गटाचा टोला

प्रियंका गांधींच्या ट्वीटनंतर काँग्रेसच्या ट्विटवर हॅण्डलवरुनही अर्थमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला. आम्ही उत्तर प्रदेशचे असून ‘युपी टाइप’ असल्याचा गर्व असल्याचं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यामुळे जनतेचा अपमान झाला असून ते नक्की धडा शिकवतील असं काँग्रेसने म्हटलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण –

राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना मोदी सरकारचं बजेट शून्यासारखं आहे. यामध्ये नोकरदार वर्ग, मध्यमवर्गीय, गरिब, वंचित, शेतकरी, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी काही नसल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेसंबंधी विचारण्यात आलं असता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांना उत्तर देण्यास सांगितलं. यावर पंकज चौधऱी यांना राहुल गांधींना बजेट समजलं नसून सर्व क्षेत्रांसाठी घोषणा करण्यात आली असल्याचं सांगितलं.

पंकज चौधरी यांच्यानंतर निर्मला सीतारमण बोलण्यासाठी पुढे सरसावल्या आणि सांगितलं की, “चौधरींनी अगदी युपी टाइप उत्तर दिलं आहे. मला वाटतं उत्तर प्रदेशातून पळून गेलेल्या खासदारासाठी इतकं फार आहे. राहुल गांधी यांनी ज्या क्षेत्रांचा उल्लेख केला त्यांच्यासाठी बजेटमध्ये काही ना काहीतरी उल्लेख आहे”.

पुढे बोलताना सांगितलं की, “मला त्या पक्षाची दया येते ज्यांच्याकडे असा नेता आहे ज्याला फक्त टीका करायचं माहिती आहे. मी टीका सहन करण्यास तयार आहे, पण त्यांच्याकडून नाही जो कोणताही अभ्यास न करता येतात”. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना सर्वात आधी काँग्रेसची सत्ता असणाऱ्या महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड या राज्यांमधील रोजगारासंबंधी बोलंल पाहिजे. महाराष्ट्रात तर कापसाचं उत्पादन घेणारे शेतकरी आत्महत्या करत आहेत असंही म्हटलं.