क्युबात ऑईल डेपोवरच वीज कोसळल्याने लागलेल्या आगीत ८० जण जखमी झाले, तर १७ अग्निशमन दलाचे कर्मचारी बेपत्ता आहेत. ही घटना शनिवारी (६ ऑगस्ट) क्युबातील मतांझास शहरात (Matanzas City) ‘मतांझास सुपरटँकर बेस’मध्ये घडली. अद्यापही आग नियंत्रणासाठी अटोकाट प्रयत्न करण्यात येत आहेत.

क्युबाच्या उर्जा आणि खाण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (५ ऑगस्ट) वादळीवाऱ्यानंतर मतांझास शहरात वीज कोसळली. ही वीज थेट शहरातील इंधन साठा असणाऱ्या मतांझास सुपरटँकर बेसवर पडली. त्यामुळे एका इंधन टँकरला आग लागली. ही आग पसरून आणखी एका इंधन टँकरला आग लागली आणि आगीने आजूबाजूचा परिसरही भक्ष्यस्थानी घेतला.

क्युबा सरकारने आगीवर नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय मदतीचं आवाहनही केलंय. यामुळे मित्र देशांमधील इंधन क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या मदतीने आग आटोक्यात आणता येईल आणि जीवितहानी कमी करता येईल, अशी त्यांना आशा आहे.

हेही वाचा : उल्हासनगर : सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या अग्निशमन दलाच्या जवांनानी वाचविले २० महिला कर्मचाऱ्यांचे प्राण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सद्यस्थितीत ही आग विझवण्यासाठी सैन्याच्या हेलिकॉप्टरचाही वापर केला जात आहे. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न होत आहे. या आगीच्या ठिकाणी काळेकुट्ट धुरांचे लोट आकाशात जाऊन आजबाजूच्या १०० किलोमीटर परिसरात पसरत आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाकडून पाण्याचा वापर करून आग आणखी पसरू नये यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.