सिरम इन्स्टिट्युटने लसीकरण क्षेत्रात मोठं यश मिळवलं आहे. करोनावरील ‘कोवोव्हॅक्स’ लसीचं उत्पादन या आठवड्यापासून सुरु केलं आहे. भारतात कोवोव्हॅक्स लसीला सप्टेंबरपर्यंत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. कोवोव्हॅक्स दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटिश व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. सप्टेंबर २०२०मध्ये नोवाव्हॅक्सने सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियासोबत करार केला होता. २ बिलियन लसींची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली होती. भारतात या व्हॅक्सिनला मान्यता मिळाल्यानंतर कोवोव्हॅक्स नावाने विकलं जाणार आहे. ही लस नोवाव्हॅक्सने विकसित केली आहे. औषध नियंत्रण महामंडळाने कोवोव्हॅक्सच्या तिसऱ्या क्लिनिकल ट्रायलसाठी आवश्यक प्रोटोकॉल संशोधनासाठी मंजुरी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“या आठवड्यात नोवाव्हॅक्सकडून विकसित केलेली करोनावरील कोवोव्हॅक्स लसींचं उत्पादन सुरु करण्यात आलं आहे. पहिली खेप लवकरच तयार होईल.”, असं सिरम इन्स्टिट्यूटकडून सांगण्यात आलं आहे. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाच्या कोविशिल्ड लसीचंही उत्पादन होत आहे. “या आठवड्यात पुण्यात कोवोव्हॅक्सच्या पहिल्या खेपेचं उत्पादन होत असल्याने उत्साहित आहे. ही व्हॅक्सिन १८ वर्षाखालील व्यक्तींसाठी सुरक्षित आहे. ट्रायल अजूनही सुरु आहे. शानदार टीम”, असं ट्वीट सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी केलं आहे.

करोनावर कोवोव्हॅक्स लसीचे दोन डोस प्रभावी असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. अमेरिकेत झालेल्या ट्रायलमध्ये गंभीर संक्रमित रुग्णांवर लस ९१ टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. तर मध्यम आणि हलक्या स्वरुपाच्या संक्रमणावर १०० टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First batch of covovax began manufacturing the serum institute of indian in pune unit rmt
First published on: 25-06-2021 at 17:15 IST