इंडोनेशियामधील ३३ वर्षीय फिटनेस इन्फ्लुअन्सर जस्टिन विकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिममध्ये २१० किलो वजनाचा बारबेल उचलत असताना मानेमध्ये दुखापत होऊन मृत्यू झाला आहे. ही घटना १५ जुलै रोजी घडली आहे. घटनेच्या दिवशी जस्टिन इंडोनेशियातील बाली येथील पॅराडाईज जिममध्ये व्यायाम करत होता.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जस्टिन विकी बाली येथील पॅराडाईज जिममध्ये खांद्यावर बारबेल घेऊन स्क्वाट प्रेस (खाद्यावर वजन घेऊन उठाबशा काढणे) करताना दिसत आहे. स्क्वाट मारण्यासाठी तो खाली बसल्यानंतर पुन्हा उभा राहू शकला नाही. यावेळी त्याच्या खाद्यावर सुमारे २१० किलो वजनाचा बारबेल होता. तो बारबेल जस्टिनच्या मानेवर पडला आणि गंभीर दुखापत झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जस्टिन विकी हा २१० किलोग्रॅम वजन उचलण्याचा प्रयत्न करत होता. या अपघातामुळे जस्टिन विकीची मान मोडली तसेच हृदय आणि फुफ्फुसांना जोडणार्‍या महत्त्वाच्या स्नायूंमध्ये गंभीर दुखापत झाली.या घटनेनंतर जस्टिनला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. येथे जस्टिनवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली, पण शस्त्रक्रियेनंतर काही वेळातच फिटनेस ट्रेनर जस्टिन विकीचा दुर्दैवी मृत्यू झाला, याबाबतचं वृत्त ‘न्यूज एशिया’ने दिलं आहे.