पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून हल्ल्यांचे सत्र सुरू आहे. विशेष करून चीनच्या भागीदारीमध्ये ज्याठिकाणी प्रकल्प सुरू आहेत, त्याठिकाणी अतिरेकी हल्ले करण्यात येत आहेत. आज (दि. २६ मार्च) वायव्य पाकिस्तानमध्ये एका वाहनावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात वाहनातील चीनमधील पाच अभियंते आणि पाकिस्तानी वाहनचालकाचा मृत्यू झाला. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एका पाकिस्तानी वाहनातून पाच चीनी अभियंत्यांना इस्लामाबाद ते खैबर पख्तुन्ख्वामधील दासू याठिकाणी आणले जात होते. स्फोटकांनी युक्त अशा आत्मघाती व्यक्तीने पाकिस्तानी वाहनाला जाऊन धडक दिली, अशी माहिती या प्रांताचे पोलीस प्रमुख मोहम्मद अली गंदापूर यांनी दिली.

दासू प्रांतात अनेक धरणाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. याठिकाणी अतिरेकी हल्ले होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी २०२१ सालीही एका बसला स्फोटकांच्या सहाय्याने उडविण्यात आले होते. या हल्ल्यात १३ लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये नऊ चीनी नागरिकांचा समावेश होता.

चीनची गुंतवणूक असलेल्या पाकिस्तानच्या हवाई तळावर हल्ला; या आठवड्यातली दुसरी घटना

दासूमधील हल्ल्याचा योगायोग असा की, गेल्या काही दिवसांपासून चीनचे नागरिक उपस्थित असलेल्या ठिकाणांवर सातत्याने हल्ला केला जात आहे. काल (२५ मार्च) पाकिस्तानमधील दुसऱ्या क्रमाकांचे मोठे हवाई तळ असलेल्या पीएनएस सिद्दीकी येथे अतिरेकी हल्ला केला गेला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या एका गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात निमलष्करी सुरक्षा दलाचा एक कर्मचारी तर पाच हल्लेखोर मारले गेले आहेत.

दरम्यान पाकिस्तानच्या सुरक्षा दलाने गूप्त माहितीच्या आधारे खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात धडक कारवाई करत चार अतिरेक्यांचा खात्मा करण्यात यश मिळविले असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. लष्कराच्या इंटर सर्विसेस पब्लिक रिलेशनच्यावतीने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी प्रांतातील डेरा इस्लाइल खान जिल्ह्यात लपून बसलेल्या अतिरेक्यांवर गूप्त माहितीच्या आधारावर कारवाई करण्यात आली. या माहितीला जीओ न्यूजनेही दुजोरा दिला. अतिरेकी आणि सुरक्षा दलात काही वेळ चकमक उडाली, पण सुरक्षा दलाने चारही अतिरेक्यांना कंटस्नान घालण्यात यश मिळवले.

चीनची भागीदारी असलेल्या पाकिस्तानमधील ग्वादर बंदरावर दहशतवादी हल्ला; आठ अतिरेक्यांचा खात्मा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानमध्ये ९७ हल्ल्याचे प्रकार घडले आहेत. ज्यामध्ये ८७ लोकांचा मृत्यू झाला असून ११८ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर कॉनफ्लिक्ट अँड सिक्युरिटी स्टडीजने (PICSS) सांगितले आहे.